हुस्न ए कश्मिर !!!!
कश्मिर हा एक सुखद सुन्दर आणि अत्यंत अविस्मरणीय अनुभव होता।
आमचा प्रवास पुणे एयरपोर्ट पासून सुरु झाला. वीणा वर्ल्ड च्या पुणे रिप्रेजेंटेटिव्सनी स्नैक्स बैग्स आणि टिकिट्स आमच्याकडे सोपवले आणि आम्ही पुणे - दिल्ही - श्रीनगर प्रवास करत श्रीनगरला दुपारी २:३० ला पोचलो. वीणा वर्ल्ड चा रिप्रेजेन्टेटिव आम्हाला श्रीनगर एअरपोर्टवरुन हाउसबोटी वर घेऊन गेला.
हाउसबोट हा एक मस्त प्रकार आहे. सुन्दर इंटीरियर , सुबक फर्नीचर कश्मिरी स्टाइल ने छान सजवले होते. सगळीकडे आकर्षक डिज़ाइन चे कारपेट्स होते. प्रत्येक हाउसबोट मधे १ हॉल, १ डाइनिंग , १ ओपन सिटींग एरिया , ४ बेडरूम्स आणि त्यासाठी १ केयरटेकर होता. रूम च्या बाहेर आल की सुन्दर दाल लेक च दर्शन होत असे.
दाल लेक ..त्यात प्रवाश्यांची ने आण करणारे असंख्य शिकारा .... समोर हिरवागार पर्वत .... त्यावर दिसणारे ऊंच टीवी टॉवर आणि शंकराचार्यांच मंदिर. अहहा काय तो देखावा... मन पहिल्या दिवशीच प्रसन्न झाल..
दुसरया दिवशी आम्ही शंकराचार्याच्या मंदिर दर्शना साठी निघालो. ३५० पायर्या चढून एक अलौकिक सौंदर्य बघण्याचा आनंद मिळाला.डोंगरावर स्थित हे ५०० वर्ष जून मंदिर मनाला खुप शांतता देणार होत.. श्रीनगर च दर्शन आणि अख्खा दाल लेक ह्या मंदिरातून आपल्याला दिसतो. पावसाने त्या दिवशी ह्या सौंदर्यात अधिक च भर टाकली.
श्रीनगर मधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सगळ्या गाड्यांची काच दगड़ किंवा तत्सम गोष्ट लागुन फुटलेली होती. जागोजागी पुलिस किंवा CRPF चे लोक तैनात होते. मंदिराकडे जातांना विशेष सिक्योरिटी चेक होता. कैमरा न्यायला परवानगी नव्हती. मन्दिरामधे फोटो नाहीं काढता आले तरी डोळ्यांमधे ते सुन्दर दृश्य साठवून आम्ही खाली उतरलो.
नंतर चा दिवस शिकारा राइड आणि फ्लोटिंग मार्केट शॉपिंग मधे गेला.. शिकारा राइड आणि फ्लोटिंग मार्केट फार एन्जॉय केल मी .. संथ वाहणारा दाल लेक त्यात राजेशाही थाटात बसलेलो आपण ...जुनी गाणी बैकग्राउंड ला सुरु .... पांढरे,गुलाबी,पिवळे कमळ .... फार सुन्दर.... त्या राइड मधे नाव्हिका ने सांगितल की नोव्हेमबर ते फेब्रूवारी जेव्हा बर्फ असतो तेव्हा ते लोक कारपेट्स, शॉल्स , लाकड़ी वस्तु बनवतात... आणि मार्च मधे टूरिस्ट् सीजन सुरु झाला की त्या गोष्टी विकतात.
तिथेच चार चिनार नावाचा १ छोटा बेट आहे. त्या बेटावर ४ चिनार ची भली मोठी वृक्ष आहेत. नूरजहां जेव्हा नाराज असायची तेव्हा ती हया बेटावर येउन बसायची.... आणि राजा तिला चिनार च पान देऊन मनवायचा... :) :) आणि ती खुश व्हायची. आता ती वृक्ष कापल्यास मृत्युदण्डची शिक्षा होते.
श्रीनगर मधले सर्वात मोठी २ गार्डन्स बघण्याचा अनुभव आम्ही घेतला. शालीमार आणि निशात गार्डन. मुग़ल काळात ही गार्डन्स बनवली. निशात गार्डन हे नूरजहां च्या भावाने ..आसिफ खान ने तिच्यासाठी बनवले. शाहजहांन ला हे गार्डन खुप आवडले पण कालांतराने त्याने त्यापेक्षा मोठे गार्डन बांधले. ते म्हणजे शालीमार गार्डन.
ह्या दोन्ही गार्डन्स मधे फुलांची रंगपंचमी सुरु आहे असेच बघण्यारयाला वाटावे इतके सुन्दर रंग आणि विविध जातीची फुले बघायला मिळतात.
तीसरया दिवशी आमचा गूलमर्ग साठी प्रवास सुरु झाला. खडकांमधुन वाट काढत आणि पाइन वृक्षांच्या जंगलातून असा हा नयनरम्य प्रवास होता. ही वृक्ष सुद्धा अगदी रांगेत उभी असतात. आणि त्यामुळे ते डोंगरांच सौंदर्य अधिकच खुलवतात. प्रवासात CRPF च्या जवानांची वहान आम्हाला क्रॉस झाली .... मुलांनी तर बस मधून त्यांना सलाम ठोकला आणि नकळत आम्ही सुद्धा. कारण कश्मीर मधील वातावरण बघितल्यावर त्यांच्या शौर्याची महती अधिक पटली आणि त्यांच्याबद्दलचा आदर अजुन वाढला.
गुलमर्ग मधे आमच स्वागत पावसाने केला आणि कश्मीर च्या खर्या थण्डीला आम्ही सामोरे गेलो. आमच होटेल गोल्ड कोर्स जवळ होत. संध्याकाळी राणी मंदिर बघायला आम्ही चालत च गेलो आणि तो निर्णय अगदी योग्य ठरला. हिरवेगार गोल्फ कोर्स, त्या सभोवती असलेली पर्वत आणि त्या पर्वतांवर असलेला बर्फ !!!
आहाहा !!!! अगदी स्विट्ज़रलैंडला आल्या सारखे वाटले. राणी मंदिरा च्या टेकड़ी वरुन ते नयनरम्य दृश्य अजुन च सुन्दर दिसत होते. ढग,त्यावर बर्फाचे पर्वत सोबतीला एक रांगेत अभी असलेली पाईन वृक्ष आणि खाली दूरवर पसरलेला हिरवागार गोल्फ कोर्स ! ह्याच मंदिरात "जय जय शिवशंकर " हे गाण चित्रित झालय असे कळले. :)
दुसर्या दिवशी आम्ही जगप्रसिद्ध गंडोला राइड करायला गेलो. ही जगातली सर्वात उंच केबल कार राइड आहे जी २ फेसेस मधे ऑपरेट केली जाते. खुप बर्फ पडत असेल तर दूसरी फेस ही बंद पडू शकते पण आम्ही नशीबवान ठरलो आणि दोन्ही फेसेस सुरु होत्या. आदल्या दिवशी बर्फ पडून गेला होता. पहिली फेज गुलमर्ग ते कोंगडुरी पर्वतावर घेऊन जाते... साधारण त्याची ऊँची ८५३० Ft. दूसरी फेज ही अजुन ऊँच घेऊन जाते आणि आपण एका स्वर्गीय ठिकाणी पोचतो..... तेव्हा आपण चक्क १३७८० Ft ऊँच पर्वतावर असतो. बर्फामधे मनसोक्त खेळलो,स्कीइंग केला, डोळ्यांमधे आणि कैमेरा मधे हे क्षण अक्षरशः टिपून घेतले. आपले जवान बर्फामधे .....प्रचंड थंडीत आपले व आपल्या देशाचे संरक्षण कसे करतात हे बघून,अनुभवुन उर खुप भरुन आला.
त्या दिवशी संध्याकाळी लोकल साईट सीइंग केली. ..... अगदी निसर्गाच्या सान्निध्यातून चालत... थंड हवा अंगावर घेत ती संध्याकाळ फारच रम्य होती. मुलांनी घोडेस्वारी केली. घोड़ेवाल्यानी आम्हाला बर्याच चित्रपटातील शूटिंग ची स्थळे दाखवली.(राम तेरी गंगा मैली, मिशन कश्मीर,बॉबी etc)
पुढील दिवशी आम्ही पहलगाम साठी निघालो. परत एकदा पाईन वृक्षांची जंगल .... सगळीकडे पर्वत आणि त्यातून मार्ग काढत आम्ही पहलगाम ला पोचलो. ती संध्याकाळ आम्हाला खरेदी साठी दिली होती. कश्मीरी प्रिंट चे ड्रेसेस, शॉल्स,स्ट्रोलस , लाकड़ी कारागिरी केलेल्या वस्तु आम्ही त्या मार्केट मधून घेतल्या. खरेदी करतांना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या म्हणजे सांगितलेल्या किमतीवर किमान ४०% सूट मागायची आणि मग च वस्तु विकत घ्यायची. आणि दूसरी म्हणजे तिथे सगळ्या लोकांना मराठी भाषा अगदी व्यवस्थित येते. ह्याचे कारण विचारल्यावर कळाले की सगळ्यात जास्त प्रवाशी कश्मीर मधे हे महाराष्ट्रातले असतात. :)
कश्मीरी स्पेशल जेवणाचा आस्वाद आम्ही ह्या ट्रिप मधे न घेतला तर नवल च. .. कारले काजू, कश्मीरी दम आलू, दुधी याखनी , चिकन याखनी, मटण लज़ीज़ ( जे दूध आणि दहयामधे शिजवलेल होत). अतिशय चविष्ट जेवून आमच मन आणि पोट दोन्ही तृप्त झाल.
पहलगाम मधे शिरताच नजरेस पडली ती लिद्दर नदी... खळखळ वाहणारी ..खड़कांमधून आपली वाट शोधत त्यांनाही भिजवून स्वत:चा निळाशार रंग न बदलू देता वाहत सुटलेली ......आणि आपल्या डोळ्यांना सुखद दर्शन देणारी.. मी तर हिच्या प्रेमात च पडले. पहलगामला अरु वैली , बेताब वैली ला आम्ही भेट दिली आणि पूर्ण प्रवासात ही लिद्दर नदी आमच्या सोबत आम्हाला नेत्रसुख दर्शन देत होती. :) अरु वैली आणि बेताब वैली ह्या निसर्ग सौंदर्याने नखशीखान्त नटलेल्या दरया आहेत. पहलगाम म्हणजे पहिला गांव. हे नाव पडण्याचा कारण म्हणजे अमरनाथ यात्रा सुरु करताना पहिला गांव जे लागत ते म्हणजे पहलगाम. पहलगाम ला आम्ही अमरनाथ यात्रेचा स्टार्टिंग पॉइंट पाहिला जिथुन लोक आपली यात्रा सुरु करतात.. तिथे अजुन एक सुन्दर..... खडकांमधुन खळखळ वाहणारी नदी होती,शेषनाग नाव तिचा. थंडगार , नितळ,निळेशार पाणी बघून एखादाच असेल जो ह्या नदीत न उतरण्याची चूक करेल.
प्रवासात आम्ही कारपेट फैक्टरी,क्रिकेट बैट फैक्टरी , केशर चे शेत ,सफरचंद ची झाडे , अक्रोड ची झाडे पाहिली. ओरिजिनल कश्मीरी कारपेट, पश्मीना शॉल, केशर कस ओळखायच हे सुद्धा आम्हाला समजावून सांगितला.अनंतपुर गावी आम्ही खूप जूने विष्णूच्या मंदिराचे अवशेष पाहिले. हे मंदिर हेमाडपंथी व ५०० वर्ष जुने होते आणि कश्मीर झालेल्या भूकंपा मधे ते पडले.
पहलगामहुन आम्ही श्रीनगर ला आलो आणि तिथे रात्री मुक्काम करून दुसरया दिवशी सोनमर्ग साठी निघालो. सोनमर्ग म्हणजे सोन्याचा मार्ग... बर्फावर सूर्याची किरणे पडून पूर्ण बर्फ़ सोनेरी रंगाचा दिसतो अशी त्याची आख्यायिका. सोनमर्ग ला जातांना सिंध नावाची नदी दिसली... जी थेट पाकिस्तानात जाते. श्रीनगर सोनमर्ग हा रोड जरा ख़राब होता... ह्याच रस्त्यावरून पुढे कारगिल आणि लडाख ला जाता येत.बजरंगी भाईजान च बरच स शूटिंग ह्या ठिकाणी झालय् असा आमच्या टूर गाइड ने सांगितल. अगदी ते लोक कोणत्या होटेल मधे मुक्कमाला होते ते होटेल सुद्धा दाखवले. :) सोनमर्ग ला आम्ही थजीवास ग्लेशियर ला ट्रेक करत गेलो. सुन्दर पर्वत... पाईन वृक्षांच्या रांगा .... एकीकडे बर्फ...बाजुला वाहणारी सिंध नदी...... अहहा .. काय तो देखावा... १ पुस्तक घेऊन तिथे आरामशिर वाचत बसाव अशी इच्छा न झाली तर नवल च.
सोनमर्गहुन आम्ही परत श्रीनगर ला आलो आणि तिथून परतीचा प्रवास सुरु झाला.
मनात खूप सारया सुन्दर आठवणी साठवून आम्ही पुण्याला पोचलो. काश्मीर हे खरच नंदनवन आहे आणि स्विट्ज़रलैंड पेक्षाही सुन्दर आहे ह्याचा अनुभव ह्याची देहि ह्याची डोळा घेतला.