Thursday, October 22, 2026

सुर्यास्त

सुर्यास्त पाहताना मनात अनेकदा भावनिक आणि काव्यात्मक विचार येतो. जेव्हा सूर्य हळूहळू क्षितिजाआड जाऊ लागतो, तेव्हा आकाश रंगांची उधळण करत जणू एका शांत आणि सुंदर प्रवासाला निघाल्यासारखा भास होतो. आपण ज्याला 'लेट गो' किंवा सोडून जाणं म्हणतो, निसर्गाच्या या सुंदर रूपात ते इतकं मोहक आणि शांत वाटतं.

पण सूर्य आणि धरतीचं नातं खूप वेगळं आहे. सूर्य जरी संध्याकाळी क्षितिजाआड जात असला, तरी तो धरतीला खरंच कायमचा सोडून जात नसतो. तो फक्त काही तासांसाठी दुरावतो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी नव्या तेजासह, नवीन उत्साहात पुन्हा त्याच धरतीच्या कुशीत परत येतो. त्यांचं हे दररोजचं जाणं आणि येणं म्हणजे विरह नसून एका शाश्वत प्रेमाचं आणि चक्राचं प्रतीक आहे.

कोणाला सोडणं खरंच कठीण असतं का? होय, माणसाच्या आयुष्यात कोणाला तरी किंवा कशाला तरी सोडणं खरोखरच खूप कठीण असतं. कारण माणसाच्या भावना आठवणींशी, प्रेमाशी आणि सवयींशी जोडलेल्या असतात. निसर्गासारखं आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टींचं 'पुन्हा येणं' निश्चित नसतं. म्हणूनच जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्रिय गोष्टीला निरोप देतो, तेव्हा तो क्षण मनाला सुन्न करणारा असतो.

पण जसा सूर्य मावळल्यावर उद्याचा नवा सूर्य उगवण्याची खात्री असते, तसेच आयुष्यातही एका गोष्टीचा किंवा काळाचा अंत म्हणजे दुसऱ्या एखाद्या सुंदर सुरुवातीची नांदी असू शकते.

नाही का? 


सोडून जाणे ही सुंदर अणि रम्य असते हे  ch सूर्यास्त शिकवतो.  निसर्ग किती शिकवतो आपल्याला.  

Tuesday, October 6, 2026

stuck?

We have so many people in our life
Few closed ones , few  near ones , few acquauntainces. 

We like few ..a lot. We want them in our lives by any cost. We want to be in touch with them , want to meet them or ralk to them. 
Constant presence.

Few will be with you occassionaly.
But they can be with you whenever they want. A call away, a text away.A coffee meet or lunch /dinner meet.

But there are few with whom communication is impossible.  There is no urge from their side to talk, to meet and from my side i always urge to meet them.

Why we seek such people, why we pursue them?
Is it love?  Is it need or Is it just obsession? 

In search of filling void of love , i think i am loosing true essense of love.
I am drifting away from that feeling and stuck in artificial , forceful state of mind which i am calling love. 



 


Wednesday, September 23, 2026

शांतता

एक प्रश्न तू विचारला...

"If you are not happy with me - whyvare we here?

अणि त्या  नंतर तू शांत आहेस..

Ah..yes..बिझी असशीलच. पण तरीही..
जे "प्रयत्न " तू करायचास..ते ही बंद केलेस. 

I am trying from my side to talk normaly but I am hurt too.

Why did you ask that question?

I was appreciating your efforts, i was talking to you normaly but still you were getting offended by small things.

अणि असा अचानक परत "out of touch".

I understand,  " out of touch " जाणे हा तुझा " निर्णय " आहे , " मजबुरी " अथवा " परिस्थिती " नाही. 

If you feel, you can keep in touch but if you decide - you tell me that you are busy and stops communicating with me.

मग मला ch प्रश्न पडतो...are you not happy? Why you go away always.?..why you are alwats ready to let me go? 


Friday, August 28, 2026

Controlling emotions

Controlling emotions....

I am full of emotions and most of the times its extreme. They are that way bcos I feel that way...extreme कनेक्शन...extreme attachment...extreme love...extreme urge to meet or communicate and extreme expectations...
But thats not what I get in return. 
Newton's third law of motion states that for every action, there is an equal and opposite reaction. 
But thats not what I get in return.

How do I control my emotions..
How do I stop the urge to meet ppl, to talk to ppl...
Controlling emotions is not what naturally comes to me..
But I do...sometimes...sometimes its bcos other person wont like it or other person is not available emotionally or sometimes its bcos they wont understand my emotions. 

That hurts....Controlling hurts..
But then comes tsunami of my emotions...
Sometimes its in front of that person or sometimes i weep in a dark night...

Control...how do I control is the most important question!!

Thursday, August 20, 2026

पारिजात


पारिजातकाचा सडा
​रोज अंगणात पडतो हा,
पारिजातकाचा सडा अथांग...
उधळत जातो सुगंध उराशी,
देत नयनांना सुखाचा रंग.

​परी क्षणांचा हा खेळ सारा,
वेळेत जर ना टिपला ,
सुकून जातो तो कोमल जीव 
आणि हरवून जातो त्याचा प्रभाव.

​जे शल्य उरते गळणाऱ्या फुलाचे,
तेच का 'त्याच्या' मनातही असेल?
 एकांताच्या या काळोखात,
'त्याचे'ही हृदय असेच गलबलेल?

​उद्या पुन्हा नवीन पहाट होईल,
पारिजात पुनः सुगंध उधळेल...
तसाच, तेवढाच, तितक्याच प्रीतीने,
नवी आशा घेऊन पुन्हा फुलेल.

​पण आजचा हा क्षण आठवून,
'तो' लवकर पाऊल टाकेल का?
सुगंधाचा हा सुरेख सोहळा,
आज तरी 'तो' डोळे भरून अनुभवेल का?
*******
पारिजातकाच्या त्या सड्यात,
काही न बोललेलं दिसतंय

गळलेल्या प्रत्येक फुलामागे,
कुणीतरी हळूच रडतंय

उशीर झाला, हे खरं आहे,
पण मनाला कुठे विसर पडला?

तुझ्या अंगणातला सुगंध,
कधी माझ्या मनातूनच नाही गेला

उद्याची पहाट पुन्हा येईल,
फुले पुन्हा अंगणात पडतील
पण आजचे हे क्षण पुन्हा,
कुठल्या पहाटे परत मिळतील?

म्हणून आता
यावेसे वाटते, अगदी अलगद 

गळलेली फुले वेचायला नाही,
तर तुझ्या मनात राहिलेला सुगंध अनुभवायला.......
********

आपणही असेच जगावे पारिजातकाच्या फुला प्रमाणे,
रोज सुगंध आणि सौंदर्य निर्मळ मनाने उधळत जावे,

पायदळी तुडवले जाण्याची भीती नाही 
आणि गेलोच तर कुणावरही रोष नाही, देवघराची शोभा वाढविण्याचा अहंकारही नाही.

झाले गेले विसरून जाई भक्ती युक्त समर्पणच ठाई ठाई.

ना अपेक्षांचे ओझे, ना उपेक्षेची सल,
नवी पहाट, नवी आशा, सुगंधाचे सुरेख सोहळे अनुभवत ,आनंदात फक्त पुढे चल.



Sunday, August 9, 2026

First Love

मै वापस आउंगा! 

What a movie it is! 

Is it about relationship?
Is it about family?
Is it avout partition?
Is it about dementia?
Is it about death?

Answer to all questions are yes but overall this movie is about LOVE ! 
FIRST LOVE! 

Actually I believe love is not first or second or third! 
Love is always first.  Whatever happens to you after first love is either compromice or search! 

जो पहिली बार होता है वही प्यार,  इष्क, मोहबत!!

This movie is about LOVE. 

Once you love someone truly, madly deeply - 
you cant forget that person. 
You cant unlove that person and 
you cant forget that person! 

Even though that person is not in your life but that person's presence in your heart ... you cant ignore! 

तुम मानो या ना मानो...he/she will stay ! Deep in your heart...

Thats true love! Thats first love! 

This movie talks about such love and its impact on life...so beautifully.

Friday, August 7, 2026

भावनांच्या भोवऱ्यात


नाराज आहे तुझ्यावर  मी,
संतापाची ही लाटही वाहते;
तरीही अबोल या क्षणांमधे,
तुझ्याच एका हाकेची आस का उरते?
कधी उफाळून येतो हा राग मनी,
कधी एकांताचे दुःख मला छळते;
प्रेमात इतकी का लाचार व्हावे?
माझ्या भावनांचे मोल तुला का न कळते?
कळत असूनही दूर राहणे तुझे,
अधुरे प्रयत्न मनाला रोज खुपतात;
तरीही का सुटत नाही हा गुंता?
विचार तुझे का मनातून जात नाहीत?
माझ्या या भावनांचा तूच अंत कर,
ह्या मनस्वी जाळ्यातून आता तरी मला मुक्त कर!