Friday, September 24, 2021

पण तरीही..

पण तरीही...

शुभ रात्री आणि good morning चा रोज पाऊस पडतो सगळीकडे
पण त्यात तुझं सुप्रभात नसेल तर किती बेचैनी होते
तर तू रोज सुप्रभात पाठवच

माझं तुला असं नुसतं कॉफी साठी भेटून समाधान नाही होणारे
तुझं ही नाही होणारे हे तुलाही माहितीये
पण तरीही तू भेट

उगीच असं लांब लांब बसण्यात 
काही मजा नाही बघ
हातात हात गुंफता येत नाहीत
की खांद्याला खांदा भिडवून बसता येत नाही
पण तरीही तू भेटच

हे नुसतं चॅटिंग करून 
उगीच आभास निर्माण होतो जवळ असल्याचा
आणि चॅटिंग संपल्यावर फुगा फुटावा आणि हवा विरून जावी असं होत
पण तरीही तू व्यक्त हो

फोनवर प्रत्यक्ष बोलून समाधान होत नाही
तुझं मला दटावण ही आठवत राहतं
"मला फोनवर अश्या आवाजात आर्जव करायची नाहीत"
तेव्हा राग येतो, 
पण कळत असत की आर्जव करूनही भेटू शकत नसल्याने 
तुझ्या ही मनात किती खळबळ माजत्ये ते
पण तरीही तू दटाव मला

हे सगळं सगळं करूनही
माझ्यासाठी जी छान छोटीशी जागा तयार केली आहेस न तुझ्या जगात
ती तशीच ठेव
मला आणि माझ्या आठवणींना 
तशीही छोटीशी कुपी एवढी जागा पुरेशी आहे तुझ्या आयुष्यात सुगंध भरायला
अट मात्र एकच
ती कुपि उघडी ठेव, दरवळू दे तिचा सुवास
हवाहवासा, रोज थोडा थोडा पसरणारा,
मोहक

© मेघा

Thursday, August 12, 2021

जीवघेणा पावसाळा

का छळतोस पाऊस मला आल्यावर
का आठवतोस तू मला आभाळ भरून आल्यावर
मनातले विचार दाबून ठेवलेले 
का कोसळतात ते अश्रुंबरोबर

दाटलेले मेघ आणि मन
साचलेले तळे आणि डोळे
सुटलेला वारा आणि तुझा आवाज
पावसाची सर आणि तुझी आठवण

हे सगळं व्हायलाच हवं का?

जीव घेतो हा पावसाळा
जो तू अर्धा इथे ठेवून गेला आहेस...


-ऋ तू जा

Friday, June 18, 2021

चंद्रासोबत जवळीक

आज पेपर मध्ये बातमी वाचली
चंद्र आज दिसणार अधिक सुंदर
असेल असं खगोलप्रेमींसाठी
प्रेमवीरांसाठी चंद्र हा नेहमीच सुंदर
त्याचं मोजमापच मुळी नाही 

त्याची प्रत्येक छटा सुंदर
प्रत्येक दिवशी वाढत जाणारी  
प्रत्येक दिवशी कमी होत जाणारी
अगदी अमावास्येची रात्र ही 
आपलं अस्तीत्व लपवून चांदण्यांनी करतो सुंदर 
तरीही म्हणे आज तो दिसणारअधिक सुंदर
उद्या पेपर मध्ये अनेक प्रतिमा झळकणार
त्याच्या सौन्दर्याच्या चढाओढीच्या

पण आमच्यासारख्या प्रेमवीरांना तो नेहमीच सुंदर दिसतो 
त्याच्या दिसण्याचं मोजमाप मुळी होतचं नसतं

तो आज कितीतरी हजार किलोमीटर जवळ ही असणार आहे म्हणे

मला हसू आले, अरे तो किती जवळ आहे आपल्या
रोज तर दिसतो, अगदी खिडकीतून अथवा गच्चीतून

कधी तो प्रियकर असतो 
तर कधी कोणाची प्रेयसी
कधी प्रेमवीरांचं गाऱ्हाणे ऐकणारा तटस्थ 
तर दिवाळीत चक्क बहिणीचा भाऊ
तर कधी एकाकीपणात  असतो सखा

चंद्र हा नेहमीचं जवळचा.. 
नेहमीच सुंदर
नेहमीच आपला
पण तरीही न उमगलेला

Sunday, May 16, 2021

पाऊस आणि तू





ग्रीष्म ऋतुत तापलेली मी
आतुरतेने  वाट पाहते तुझी
दर वेळेस उशिरा पोचतोस
येणार की नाही आस मनाला लावतोस

चरे पडलेत मनावर
कोमेजून गेलंय सारं दूरवर
तापलंय इथे सगळं सगळं
शरीर जणू झालंय ठिगळं


तू तिकडे लांब वर
मी इथे निपचित पडलेली
तू पळतोय सैरा वैरा
मी स्तब्ध एक जागेवर

येशील कधी ही च एक आस
तू आहेस तसा माझा खास
नाते असो आपले निरंतर
पण आयुष्य सदा समांतर

पण तू येेेतोस...आरडाओरडा करत...गरजत 
वाट जरी खूप बघायला लावलीस
सारा रुसवा क्षणात घालवतोस


आनन्दोत्सवात  बहरुन जाते मी
मरगळ सारी निघून जाते
तुझ्या सान्निध्यात मी हरखून जाते
सगळे म्हणतात आणि मी ही जााणून आहे
सौन्दर्य जरा जास्त च खुलते तू मला भेटल्यावर

तुझी फुंकर स्पर्शून मला
मी पुन्हा जिवंत झाले
तुझे बोल कानी पडता
मी मोहरून गेले

मिलनाचे संकेत आपल्या
ना लपले कोणापासून
दूर जरी गेलास आता
येशील ना भेटाया अधून मधून??

-ऋतुजा

Sunday, March 14, 2021

I FAILED !!

 As an elite member of Regulus,

I FAILED !!! 


I failed against negative power...

I failed against evil thoughts...

I failed against bad deeds....

I failed against few's ego issues

Yes, As an elite member of Regulus..I FAILED !!! 


I got scared about legal notices..

I am afraid of entering police stations

I am frightened when police came to campus

My heart cried when kids were targeted with eggs and dirty water

Yes, As an elite member of Regulus...I FAILED !!! 


I felt bad when honest employees left because of threats and Police complaint

I was shocked to see baseless allegations against MC members

I was concerned when MC was labelled as corrupt on social media

I was surprised how 5-6 heads can damage the environment of society

Yes, As an elite member of Regulus...I FAILED !!! 


I wish everyone is surrounded by positive energy 

I wish happy place for Rego family...

I wish everyone to spend their time on constructive things

I wish everyone to stop discussing revenge and ego bits


Regulus is our family...Its the need of an hour for Regulus to be Happy and Positive Place....

Let me ask you....As an elite member of Regulus...

Have we FAILED?