Friday, January 24, 2025

तर तुझ वय झालंय !

प्रेयसी ला बोलण्याची इच्छा होत असेल आणि नुसत्या विचाराने ही तुझ मन भरत असेल तर..
तर तुझ वय झालंय !

प्रेयसी status ठेवतेय आणि तरीही तू ते बघत नसशील तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसी चा ठावठिकाणा जर तू विसरत असशील तर..
तर तुझ वय झालंय!

ह्या online जगात तू प्रेयसी ला स्टॉक करत नसशील तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसी ने पाठवलेल्या शेरो शायरी, reels, shorts बघायला तुला वेळ मिळत नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसीने dedicate केलेले गाणे, कविता ऐकायला तुला वेळ नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

संसाराच्या रहाटगाड्यातून प्रेयसी साठी तुला वेळ मिळत  नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसी च्या लाडिक रागावर तू तिला लेक्चर देत असशील आणि प्रेमाने मनवत नसशील तर..
तर तुझ वय झालंय !

प्रेमामध्ये प्रयत्न करावे लागत असतील आणि सहजता नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

आणि....

जीव ओतून प्रेम करणारी प्रेयसी असेल
आणि तरीही तू कोरडा राहत असशील तर...
तर तुझ वय झालंय !


- ऋतुजा

Thursday, January 16, 2025

धर्म

धर्म ,जात

ह्या मुळी गोष्टी आपल्या हातात नसतात च. नाही का?  जन्म झाला की त्या आपल्याला assign होतात. त्या धर्माची, जातीची शिकवण आपल्याला मिळत जाते लहानपणापासून. आपण जसे जसे मोठे होत जातो तसे आपली इतर धर्म आणि जातीशी ओळख होत जाते.

प्रत्येक जण आपल्या धर्माचा समर्थक. 
पण प्रत्येकाने स्वतःचा धर्म खरंच जाणला आहे का? की fact जे लहानपणापासून सांगितले, कळले त्या प्रमाणे तो वागतोय ? किंवा आजकाल सोशल मीडिया वर जे काही उपलब्ध आहे त्या प्रमाणे भरकटतो आहे? 

कोणता धर्म original आणि प्रत्येक धर्म काय सांगतो ते कळण्यासाठी प्रत्येक धर्माचे ग्रंथ वाचावे लागतील.

हिंदू धर्म सांगतो सहिष्णू रहा..पण आजकाल कोण हिंदू सहिष्णू आहे

बुद्ध धर्म सांगतो मूर्ती पूजा करू नका पण सगळ्या मोठ्या मुर्त्या गौतम बुद्धाच्या आहेत .

मुस्लिम धर्म दहशतवाद पसरवायला सांगतो का? नाही  पण बहुतांश दहशत ही मुस्लिम लोक पसरवतात असा समज का आहे? 

धर्म जपणारे, धर्माचा प्रसार करणारे खरंच त्यांचा धर्मग्रंथ वाचून हे सगळं करत आहेत की fact वर वर चे ज्ञान आहे हे ? 

कोणत्या धर्मात असे लिहिले आहे की.. 
१. दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करा. 
२. दुसऱ्या धर्माच्या लोकांशी बोलू नका, व्यवहार करू नका , 
३. कोणतेही काम त्यांच्याकडून करू नका. ४. दुसऱ्या धर्माचे जे पूजनीय दैवत आहेत त्यांचे existence नाकारा.

कोणता धर्म असे सांगतो?


तुमच्या जन्मी जो धर्म तुम्हाला assign झालाय त्या धर्माला अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या करा. जरूर करा.

But please stop comparing and showing wrong deeds of other religions. 
Stop hating people of other religions. 

माणूस म्हणून जगा.जात धर्म सोडा .

माणुसकी हा धर्म आधी पाळा.

-- ऋतुजा




Monday, January 6, 2025

ह्या वळणावर..मागे वळून बघतांना

२०२५ सुरू झाले...वयाचे ४५ वर्ष सरले...आयुष्याच्या वाटेवर अर्ध्यापेक्षा नक्कीच पुढे आले आहे.

ह्या वळणावरून मागे वळून पाहताना ३ वाटा दिसतात..

पहिली वाट... खूप साऱ्या प्रेमळ आठवणी, प्रसंग, व्यक्ती आणि घटना दिसतात ह्या वाटेकडे. ह्या वाटेने खूप सारे आनंद दिले आयुष्यात. सुखाचे क्षण अनुभवले ते ह्याच वाटेवर.

दुसरी वाट...संकटांची, आव्हानांची आणि दुःखाची. ह्या वाटेने जरी आयुष्यात दुःख दिले, संकट आणले तरीही त्यामुळे मी strong झाले, कणखर बनले. मी घडत गेले ते ह्या वाटेवर आलेल्या आव्हानांमुळे.
प्रत्येक आव्हानाचा सामना करत स्वतःला सांभाळत, घडत गेले. ही वाट तेवढीच महत्त्वाची.

तिसरी वाट....न सुटलेल्या कोड्यांची. आयुष्यात काही कोडी असतात...तिचा भाग आपण असतो पण ती सुटत नाहीत...
like unsolved mysteries... असे काही unsolved mysteries राहून जातात त्या वाटेवर. असे वाटत राहते की ही कोडी सुटावी आयुष्यातली  किंवा काही गोष्टी ज्या आयुष्यात करायच्या राहून गेल्या...मागे पडल्या...परत मागे जाणे शक्य नसते त्या वाटेवर पण तरीही मागे वळून पाहिले की त्या गोष्टी दिसतात आणि खटकतात ..कारण कुठलीच अपूर्ण गोष्ट आयुष्यात नसावी असे मला वाटते  .

ह्या वळणावर नियती आपले life account settle करायला सुरुवात करत असेल का? 
काही घटना आयुष्यात अश्या घडत जातात किंवा काही व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येतात ज्यामुळे आयुष्यातली ह्या पूर्वी न सुटलेली कोडी सुटायला सुरुवात होते.  ...  पूर्वी असलेले गैरसमज दूर व्हायला मदत होते....

आयुष्याच्या उत्तरार्धात आपण प्रवेश करतोय ह्याची ही सूचना असेल का?

-- ऋतुजा





Friday, January 3, 2025

भास

मी मागे नसतानाही,
असल्याचा भास होतो ना तुला!
लोकांशी महत्वाचं बोलतानाही
माझा जोक आठवतो ना तुला!
आपण गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!
इतरांसोबत जोरात हसतानाही,
माझा दुरावा रडवतो ना तुला!
कधी उदास वाटतानाही,
माझा चेहरा हसवतो ना तुला!
तुला नको असतानाही,
माझा आवाज लाजवतो ना तुला!
तू शब्दांनी नाकारतानाही
चेहराच सांगतो ना
मी आवडतो तुला!

मी सोबत आहे असे तू कितीही वेळा सांगितले तरीही 
तू सोबत नसल्याचीच भावना जास्त असते!

लोकांशी महत्वाचं बोलतानाही
तुझ सोबत नसणं आठवत मला!

मी गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत तू नाहीस , मी एकटी आहे हे च जाणवते  मला!

इतरांसोबत जोरात हसतानाही,
तुझा दुरावा नेहमी च जाणवतो  मला!

कधी उदास वाटतानाही,
तुझा चेहरा आठवून अजून उदास व्हायला होतं मला !

मला तू हवा असतानाही,
माझ्या पासून तू दूर जातोस !

तू कितीही शब्दांनी सांगितले की मी आवडते तुला
तरीही ते मला जाणवत का नाही  !!


मनाला आनंद देते
प्रेमाची तुझी साद

कितीही कठोर वागलो तरी 
तू कायम आनंद देतेस

प्रेम  म्हटल की, 
रुसवा आलाच 

तरीही त्यातून पार पडत 
सांभाळतेस  तू मला




Wednesday, January 1, 2025

प्रेम

प्रेम काय असतं?

1. एखादी व्यक्ती आवडणे...
2. आवडलेल्या व्यक्तीचा ध्यास असणे
3. त्या व्यक्तीला बघण्याची इच्छा असणे
4. त्या व्यक्तीला बघण्याची संधी शोधत राहणे
5. त्या व्यक्तीसोबत बोलावे वाटणे
6. त्या व्यक्तीसोबत बोलण्याची संधी शोधत राहणे
7. त्या व्यक्तीला भेटावे वाटणे...
8. त्या व्यक्तीला आपल्या भावना समजाव्या, आपल्या मनातले प्रेम व्यक्त करावे वाटणे..

हो!! नक्कीच !!
ह्या सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात एक तर्फी प्रेमात.

जर ते प्रेम दोन्ही बाजूने असेल तर हे सगळे करावे वाटते च पण त्या बरोबर अजूनही काही गोष्टी असतात. जसे की..

१. समोरच्याचे प्रेम समजून घेणे..
२. त्या व्यक्तीचे प्रेम receive करणे. हो..receive करणे. कारण समोरचा ज्या प्रकारे आपल्यावर प्रेमाची बरसात करतो ते प्रेम accept करणे सुद्धा गरजेचे असते.
जर ते प्रेम तुम्ही receive च नाही करू शकले तर तुम्ही कमनशिबी आहात आणि अर्थात तो समोरचा ही.
३. समोरचा व्यक्ती खुश आहे की नाही आपल्यासोबत , आपण त्याच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही हे बघणे ही महत्त्वाचे.
४. प्रेम व्यक्त करणे आणि ते समोरच्या पर्यंत पोचवणे.

ह्या गोष्टी आपसूक होतात जेव्हा प्रेम दोन्ही बाजूने तितक्याच intensity ने असते. 
पण जर एखाद्याची intensity कमी असेल किंवा प्रेम करण्याची तेवढी capacity च नसेल तर...?

ह्यातल्या काही गोष्टी होत नसतील तर ते अर्धवट प्रेम असते का? 

देढ इश्किया !!

😄😄