ह्या वळणावरून मागे वळून पाहताना ३ वाटा दिसतात..
पहिली वाट... खूप साऱ्या प्रेमळ आठवणी, प्रसंग, व्यक्ती आणि घटना दिसतात ह्या वाटेकडे. ह्या वाटेने खूप सारे आनंद दिले आयुष्यात. सुखाचे क्षण अनुभवले ते ह्याच वाटेवर.
दुसरी वाट...संकटांची, आव्हानांची आणि दुःखाची. ह्या वाटेने जरी आयुष्यात दुःख दिले, संकट आणले तरीही त्यामुळे मी strong झाले, कणखर बनले. मी घडत गेले ते ह्या वाटेवर आलेल्या आव्हानांमुळे.
प्रत्येक आव्हानाचा सामना करत स्वतःला सांभाळत, घडत गेले. ही वाट तेवढीच महत्त्वाची.
तिसरी वाट....न सुटलेल्या कोड्यांची. आयुष्यात काही कोडी असतात...तिचा भाग आपण असतो पण ती सुटत नाहीत...
like unsolved mysteries... असे काही unsolved mysteries राहून जातात त्या वाटेवर. असे वाटत राहते की ही कोडी सुटावी आयुष्यातली किंवा काही गोष्टी ज्या आयुष्यात करायच्या राहून गेल्या...मागे पडल्या...परत मागे जाणे शक्य नसते त्या वाटेवर पण तरीही मागे वळून पाहिले की त्या गोष्टी दिसतात आणि खटकतात ..कारण कुठलीच अपूर्ण गोष्ट आयुष्यात नसावी असे मला वाटते .
ह्या वळणावर नियती आपले life account settle करायला सुरुवात करत असेल का?
काही घटना आयुष्यात अश्या घडत जातात किंवा काही व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येतात ज्यामुळे आयुष्यातली ह्या पूर्वी न सुटलेली कोडी सुटायला सुरुवात होते. ... पूर्वी असलेले गैरसमज दूर व्हायला मदत होते....
आयुष्याच्या उत्तरार्धात आपण प्रवेश करतोय ह्याची ही सूचना असेल का?
-- ऋतुजा
No comments:
Post a Comment