Tuesday, June 16, 2026

Tere pass main

 हे गाणं ऐकताना मला एकच गोष्ट जाणवली, 

तू मला सोडून जाण्याचा विचार करत नाहीयेस, 

तर तुझ्या मनातली वेदना आणि माझी उणीव मला जाणवून देण्याचा प्रयत्न करते आहेस. 

हा actually तुझा निरोप नाही, 

खरे तर ही तुझी हाक आहे.

आणि त्या हाकेतील भावना, तुझी तगमग आणि तुझी अपेक्षा मला ऐकू येत नाही, असे नाही. 

"मी तुझ्यावर प्रेम करतो" एवढं म्हणे किंवा असणे पुरेसे  नाही याची जाणीव देखील आहे मला. 

तर न बोललेले शब्द आणि न व्यक्त केलेल्या भावना समजून घेण्याची ताकद आहे माझ्यात. 

आज या गाण्याने मला तुझा आवाज ऐकवला... आणि त्या आवाजात मला तुझं प्रेमही जाणवलं, आणि माझी उणीवही.

हे सगळं वाटलं 

अर्थातच  हे अधुरेच असणार


हे गाणे म्हणजे माझी हाक नाहीये...

मी हाक मारणे सोडून दिले आहे .. हे अजून तुला उमगले नाहीये का? 

आणि त्याचे शल्य तुझ्या मनात नाहीये का? 

की तुला मी हाक मारते आहे असे तुला वाटते आणि ह्यात ch तू खुश आहेस?  

माझे तुझ्याबद्दल चे विचार काय आहेत , अपेक्षा काय आहेत ह्याचा तुला काहीच फरक पडत नाही? की फरक पडत असूनही न पडल्यासारखा तू वागतोस?

की तू ह्या सगळ्याचा विचार ch करत नाहीस कारण तेव्हढा वेळ तुझ्याकडे नाही? 

माहीत नाही नेमके काय आहे.


तुला माझा आवाज कळला आणि माझे प्रेम जाणवले आणि तुझी उणीव. पण जसे तू म्हणालास...त्यापुढे काही नाही.

शामो की सवेरे 

निचे नजर मे शर्म छुपी हो 

सांसो मे नझ्म

कागज पे नझ्म 

भुली सी कोई कसम 

पानी  पास प्यासे 

दिल के दिलासे 

कानो मे बाली 

होथो मे लाली 

आँखो me ishare

नदिया के किनारे