Friday, January 23, 2026

कथ्थक

तुझ्या तालावर झुलावे माझे मन,
लयीसोबत धडधडावे माझे हृदय,
 नाचताना तू..
त्या क्षणात विरघळावे माझे मीपण 

पावलांतून साकारावी हळवी स्वप्ने,
नजरेच्या एका कटाक्षातच
हरवून बसावे हृदय माझे … नकळतच.....

प्रेमाने प्रेम सांगशील जेव्हा,
नृत्यातून उमलावी भावना,
कळावे तेव्हा ...
प्रेम हे शब्दात नसते केवळ,
ते असते तुझ्या कथ्थकात देखील... 

...

Tuesday, January 20, 2026

बस्स तू है

बस फिर भी
प्यार आता है तुमपे,
तुम्हारी हर ख़ामोशी पर,
हर अनकही बात पर।

कमियाँ हैं, नाराज़गियाँ हैं,
शिकवे–गिले भी हज़ार हैं,
पर इन सबके बावजूद
तुम ही मेरे दिल का इकरार हैं।

बस फिर भी
प्यार आता है तुमपे,
तुम्हारी हर ख़ामोशी पर,
हर अनकही बात पर।

असे वाटते की
लिहित जावे…
शब्द शब्दांत गुंफत जावे,
मनातले सगळे कागदावर उतरवावे
तुझ्या आठवणींना ओळी द्याव्या,
अन् प्रत्येक श्वासाला नवा अर्थ द्यावा..

असे वाटते ki..
तुला ऐकत रहावे 
तू बोललेला शब्द 
जणू कविता व्हावी 
अणि मी वहि बनून जावे


Saturday, January 17, 2026

भेट

निमित्त तुझ्या भेटीचं मिळालं,
आणि मनामध्ये आठवणींनी पुन्हा पालवी फुटली…
तुला पाहीन या कल्पनेनं
श्वासातही हळूच गोडवा भरला.

तुला बोलेन, न बोलेले शब्द
आज ओठांवर येऊन थबकतात,
डोळ्यांसमोरून जातात
त्या क्षणांच्या मूक कथा.

किती तरी गोष्टी, किती तरी वाटा
एकामागून एक उजळून निघतात,
आठवणींच्या सावलीत
मन अलगद हरवून जातं.

तुला भेटण्याची तडफ
क्षणोक्षणी वाढत जाते,
जणू प्रत्येक धडधड म्हणते—
मी तुला भेटण्यासाठीच मरतो आहे…

Friday, January 9, 2026

ती

ती…
माझं मन नकळत चोरणारी,
डोळ्यांत पाहताच विचार विसरायला लावणारी…

ती हसली की काळ थांबतो,
आणि न बोलताही
माझ्यावर प्रेमाची हुकूमत गाजवते…

माझ्या शब्दांवर नाही,
तर माझ्या शांततेवर
हक्क सांगणारी ती…

ती माझी कमजोरीही आहे
आणि माझी ताकदही,
माझ्या आयुष्यावर
माझ्याही नकळत 
हळूच राज्य करणारी .. ती…

ती...
माझ्या श्वासांत 
नकळत मिसळलेली,
डोळे मिटले तरी 
समोर उभी राहणारी…

तिच्या एका नजरेत,
तिच्या हसण्यात
अख्खं जग सामावलेलं …

तिची माझ्यावर प्रेमाची हुकूमत
आदेशांनी नाही,
 स्पर्शांनी,
मौनाने,
आणि काळजावर उमटणाऱ्या
अदृश्य सहीने …

मी हरवतो तिच्यात
इतका की उरत काहीच नाही—
तीच श्वास,
तीच धडधड,
आणि तीच…

वचन

मी जे काही बोललो,
ते क्षणिक भावना नव्हत्या,
तर बराच काळ मनात साठून राहिलेलं सत्य होतं.
प्रत्येक शब्दामागे मनाचा ठोका होता,
प्रत्येक वाक्यामागे प्रामाणिक भावना.

माझ्या मनात कधीच खोट नव्हती,
ना स्वतःचा फायदा पाहण्याचा स्वार्थ.
कारण माझ्यासाठी प्रेम म्हणजे अपेक्षा ठेवणं नाही,
तर निस्वार्थपणे देणं—
मौनातून, संयमातून, आणि समजुतीतून.
प्रेम हे हक्क मागण्यासाठी नसतं,
ते समोरच्याला मोकळं ठेवण्यासाठी असतं,
त्याच्या आनंदात आनंद शोधण्यासाठी असतं—
यावर माझा खरंच अतूट विश्वास आहे.
म्हणूनच मी नेहमी देणंच महत्त्वाचं मानलं.
मला एवढंच ठाऊक आहे
की माझं तुझ्यावर प्रेम आहे—
हे ठाम आहे.
कदाचित मला ते नीट व्यक्त करता येत नसेल,
शब्द कधी अपुरे पडतात,
तर कधी भावना शब्दांपेक्षा मोठ्या ठरतात.
कसं बोलावं, कधी बोलावं,
किती बोलावं—
हे सगळं मला नेहमीच जमत नाही.
पण याचा अर्थ असा अजिबात नाही
की मी तुला दुखावू इच्छितो
किंवा तुझ्या भावना गृहीत धरतो.
जर कधी माझ्या शब्दांनी तुला वेदना दिल्या असतील,
तर ते अज्ञानातून झालं असेल,
उपेक्षेतून नव्हे.
कारण तुझं दुःख
माझ्यासाठी कधीच क्षुल्लक नव्हतं.
आजही, या क्षणीसुद्धा,
तू तितकीच सुंदर दिसतेस—
फक्त दिसण्यात नाही,
तर तुझ्या अस्तित्वात,
तुझ्या स्वभावात,
तुझ्या शांततेत.
अशी सुंदर की
कोणीही सहज तुझ्या प्रेमात पडावं…
आणि आज, पुन्हा एकदा,
मीही—
त्याच आदराने, त्याच आपुलकीने.
मी वचन देऊ शकत नाही
की माझे शब्द नेहमी अचूक असतील,
पण माझे प्रयत्न नेहमी प्रामाणिक असतील.
मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन,
थांबण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करेन. 
कारण माझ्यासाठी प्रेम
जिंकण्याचं नाही,
टिकवण्याचं आहे—
दुखावून नाही,
सांभाळून.
आणि म्हणूनच,
मी प्रामाणिक प्रयत्न करेन…
आज, उद्या, आणि पुढेही.