मी मागे नसतानाही,
असल्याचा भास होतो ना तुला!
लोकांशी महत्वाचं बोलतानाही
माझा जोक आठवतो ना तुला!
आपण गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!
इतरांसोबत जोरात हसतानाही,
माझा दुरावा रडवतो ना तुला!
कधी उदास वाटतानाही,
माझा चेहरा हसवतो ना तुला!
तुला नको असतानाही,
माझा आवाज लाजवतो ना तुला!
तू शब्दांनी नाकारतानाही
चेहराच सांगतो ना
मी आवडतो तुला!
मी सोबत आहे असे तू कितीही वेळा सांगितले तरीही
तू सोबत नसल्याचीच भावना जास्त असते!
लोकांशी महत्वाचं बोलतानाही
तुझ सोबत नसणं आठवत मला!
मी गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत तू नाहीस , मी एकटी आहे हे च जाणवते मला!
इतरांसोबत जोरात हसतानाही,
तुझा दुरावा नेहमी च जाणवतो मला!
कधी उदास वाटतानाही,
तुझा चेहरा आठवून अजून उदास व्हायला होतं मला !
मला तू हवा असतानाही,
माझ्या पासून तू दूर जातोस !
तू कितीही शब्दांनी सांगितले की मी आवडते तुला
तरीही ते मला जाणवत का नाही !!
मनाला आनंद देते
प्रेमाची तुझी साद
कितीही कठोर वागलो तरी
तू कायम आनंद देतेस
प्रेम म्हटल की,
रुसवा आलाच
तरीही त्यातून पार पडत
सांभाळतेस तू मला
No comments:
Post a Comment