ह्या मुळी गोष्टी आपल्या हातात नसतात च. नाही का? जन्म झाला की त्या आपल्याला assign होतात. त्या धर्माची, जातीची शिकवण आपल्याला मिळत जाते लहानपणापासून. आपण जसे जसे मोठे होत जातो तसे आपली इतर धर्म आणि जातीशी ओळख होत जाते.
प्रत्येक जण आपल्या धर्माचा समर्थक.
पण प्रत्येकाने स्वतःचा धर्म खरंच जाणला आहे का? की fact जे लहानपणापासून सांगितले, कळले त्या प्रमाणे तो वागतोय ? किंवा आजकाल सोशल मीडिया वर जे काही उपलब्ध आहे त्या प्रमाणे भरकटतो आहे?
कोणता धर्म original आणि प्रत्येक धर्म काय सांगतो ते कळण्यासाठी प्रत्येक धर्माचे ग्रंथ वाचावे लागतील.
हिंदू धर्म सांगतो सहिष्णू रहा..पण आजकाल कोण हिंदू सहिष्णू आहे
बुद्ध धर्म सांगतो मूर्ती पूजा करू नका पण सगळ्या मोठ्या मुर्त्या गौतम बुद्धाच्या आहेत .
मुस्लिम धर्म दहशतवाद पसरवायला सांगतो का? नाही पण बहुतांश दहशत ही मुस्लिम लोक पसरवतात असा समज का आहे?
धर्म जपणारे, धर्माचा प्रसार करणारे खरंच त्यांचा धर्मग्रंथ वाचून हे सगळं करत आहेत की fact वर वर चे ज्ञान आहे हे ?
कोणत्या धर्मात असे लिहिले आहे की..
१. दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करा.
२. दुसऱ्या धर्माच्या लोकांशी बोलू नका, व्यवहार करू नका ,
३. कोणतेही काम त्यांच्याकडून करू नका. ४. दुसऱ्या धर्माचे जे पूजनीय दैवत आहेत त्यांचे existence नाकारा.
कोणता धर्म असे सांगतो?
तुमच्या जन्मी जो धर्म तुम्हाला assign झालाय त्या धर्माला अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या करा. जरूर करा.
But please stop comparing and showing wrong deeds of other religions.
Stop hating people of other religions.
माणूस म्हणून जगा.जात धर्म सोडा .
माणुसकी हा धर्म आधी पाळा.
-- ऋतुजा
No comments:
Post a Comment