पाऊस, तू आणि मी
मला पाऊस आवडतो आणि तूही,
आपसूकच तुलना होते तुम्हा दोघांची...
पाऊस आला की तुझी आठवण येते, हे खरंय,
कदाचित आपली ती पहिली भेट, पावसातलीच होती ना?
तेच शहारे... तुला भेटताना आणि पावसात भिजताना,
तेच आल्हाददायक वातावरण,
ते सगळे रुसवे-फुगवे काढणे,
आणि त्या आश्वासनांच्या गप्पा...
भासतोस तू अगदी या पावसासारखा!
पण पाऊस नेहमी येतो... कधी उशिरा, कधी अगदीच अवकाळी,
कधी संथ सुखावणारी संततधार, तर कधी बेधुंद मुसळधार.
तो इतका बरसतो की समोरचं काही दिसेनासं होतं,
अगदी तशाच... जशा माझ्या अश्रुधारा बरसतात,
फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत...
आभाळा एव्हढ प्रेम केले आहे म्हंटल्यावर पावसा सारखी मी बरसणार् ch....
म्हणूनच, पाऊस असताना तू आठवतोस जरा जास्त...
इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा!