आज पेपर मध्ये बातमी वाचली
चंद्र आज दिसणार अधिक सुंदर
असेल असं खगोलप्रेमींसाठी
प्रेमवीरांसाठी चंद्र हा नेहमीच सुंदर
त्याचं मोजमापच मुळी नाही
त्याची प्रत्येक छटा सुंदर
प्रत्येक दिवशी वाढत जाणारी
प्रत्येक दिवशी कमी होत जाणारी
अगदी अमावास्येची रात्र ही
आपलं अस्तीत्व लपवून चांदण्यांनी करतो सुंदर
तरीही म्हणे आज तो दिसणारअधिक सुंदर
उद्या पेपर मध्ये अनेक प्रतिमा झळकणार
त्याच्या सौन्दर्याच्या चढाओढीच्या
पण आमच्यासारख्या प्रेमवीरांना तो नेहमीच सुंदर दिसतो
त्याच्या दिसण्याचं मोजमाप मुळी होतचं नसतं
तो आज कितीतरी हजार किलोमीटर जवळ ही असणार आहे म्हणे
मला हसू आले, अरे तो किती जवळ आहे आपल्या
रोज तर दिसतो, अगदी खिडकीतून अथवा गच्चीतून
कधी तो प्रियकर असतो
तर कधी कोणाची प्रेयसी
कधी प्रेमवीरांचं गाऱ्हाणे ऐकणारा तटस्थ
तर दिवाळीत चक्क बहिणीचा भाऊ
तर कधी एकाकीपणात असतो सखा
चंद्र हा नेहमीचं जवळचा..
नेहमीच सुंदर
नेहमीच आपला
No comments:
Post a Comment