Friday, August 7, 2026

भावनांच्या भोवऱ्यात


नाराज आहे तुझ्यावर  मी,
संतापाची ही लाटही वाहते;
तरीही अबोल या क्षणांमधे,
तुझ्याच एका हाकेची आस का उरते?
कधी उफाळून येतो हा राग मनी,
कधी एकांताचे दुःख मला छळते;
प्रेमात इतकी का लाचार व्हावे?
माझ्या भावनांचे मोल तुला का न कळते?
कळत असूनही दूर राहणे तुझे,
अधुरे प्रयत्न मनाला रोज खुपतात;
तरीही का सुटत नाही हा गुंता?
विचार तुझे का मनातून जात नाहीत?
माझ्या या भावनांचा तूच अंत कर,
ह्या मनस्वी जाळ्यातून आता तरी मला मुक्त कर!

No comments:

Post a Comment