Sunday, August 20, 2023

देवबाभळी

देवबाभळी...दोन बायकांची गोष्ट!

बायकांच्या गोष्टी , व्यथा, कथा सगळेच मांडतात...मग ते पुस्तक असो, चित्रपट असो नाटक असो किंवा मालिका.
पण देवबाभळी वेगळं का आहे.. एवढ्या पारितोषीकांच मानकरी का ठरलंय किंवा मराठी नाट्यसृष्टीतील mile stone नाटक का ठरलंय हे जाणून घेण्यासाठी नाटक बघणे फार गरजेचं आहे.

१. दोन बायका, त्या ही थोर पुरुषांच्या (!). पुरुष की देवमाणूस..की देव च!!
होय....एक संत तुकाराम ह्यांची गर्भवती बायको अवलि आणि दुसरी खुद्द रखुमाई..विठ्ठलाची बायको.

२. दोघींची दुःख वेगळी...दोघींचं मन वेगळ्या गोष्टीसाठी झुरतय...दोघींची परिस्थिती वेगळी...पण नाटकाअंती ह्या दोघी एकमेकींना बरच काही शिकवून जातात....एकमेकींची दुःख कळत नकळत कमी करण्याचा प्रयत्न करतात.... एकमेकीकडून काहीतरी घेऊन जातात...

३. संत तुकारामांचे अभंग ह्या दोघीही ह्या नाटकात वेळोवेळी संदर्भासहित गातात आणि ते रेकॉर्डेड नाही तर प्रत्यक्ष स्टेज वर गातात..तबला, पेटी ह्यांची साथ ही त्यांना असते. हा एक विलक्षण अनुभव.काय ते पाठांतर , काय तो आवाज आणि सुर.
एका scene मध्ये भाकरी थापत असते रखुमाई ..त्या सुद्धा खऱ्या थापताना आणि चुलीवर भाजतांना दाखवल्या आहेत.

४.ह्या दोघीही इतक्या थोरांच्या बायका ..सगळी जनता त्या दोघांनाही केवळ पुजते...पण ह्यांची दुःख कोणापर्यंत पोचली नाही..त्या उलट.. अवली ला संत तुकारामांचे पांडुरंगमय होणे कधी उमजलेच नाही हे च आपण ऐकत आलोय. पण ह्या नाटकात आपल्याला अवली ची बाजू बघायला मिळते..आणि तिच्या दुःखात आपण एकजीव होऊन जातो.

५. अवली बरोबर च रखुमाई च दुःख ही आपल्याला कळत..ह्या angle ने मी आत्तापर्यंत कधीच विचार केला नव्हता....
पण ते दाखवायचं, आपल्या पर्यंत पोचवायचे धाडस लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख ने केलंय. मनापासून आभार आणि कौतुक ह्या युवा दिग्दर्शकाचे....

६. ह्या दोघींच्या तोंडी असलेले अभंग, त्यांचे संवाद ऐकून नकळतपणे आपले  डोळे अनेक वेळा पाणावतात...आणि असे वाटून जाते की कोणताही काळ असो...कोणाचीही बायको असो..कितीही मान असो ...बायकांचे दुःख समजून घेणे फार कठीण !!!!!

७.अभिनयाबद्दल तर काय बोलावे..ह्या दोघींनी सुरेख कामे केली आहेत. अवली झालेली शुभांगी पूर्ण नाटक..पायाला देवबाभळीचा काटा रुतलेला म्हणून लंगडत आणि अंगठा वर करून चालते...९० मिनिटा पैकी ८० मिनिट ती अशीच दाखवली आहे आणि तिने ते कठीण काम लीलया पेलले आहे.

८.ह्या नाटकात इंद्रायणी नदीचे ही खूप महत्त्व आहे..जणू एका व्यक्तिस्वरुप...
इंद्रायणी नदीच्या पाण्याचा आवाज अगदी  प्रेक्षकांपर्यंत पोचतो जणू काही खरेच आपण नदीवर आहोत.

९. कथा, दिग्दर्शन, संगीत, अभिनय, नेपथ्य सगळंच अगदी जमून आलंय...जमून काय सर्वोत्कृष्ट झालंय...

१०.अजून खूप काही मनात आहे .सतत हे नाटक, त्या दोघी मनात रुंजी घालत आहेत पण सारेच शब्दातीत करणे कठीण....

देवातील माणूस आणि माणसातील देव सापडतील असे हे नाटक.

देवबाभळी टीम आणि मराठी नाट्य संस्कृती ला माझा सलाम !!!

Must watch...



No comments:

Post a Comment