*रात्रीच्या शांततेत,*
*तुझे नाव गुणगूणताना,*
*वाऱ्यातील एक कुजबुज,*
*एक थंडगार झुळूक...*
*शांततेतून जाणीव होणारी*
*मैलो अंतरावर असणारी तु*
*तू माझ्या श्वासात,*
*माझ्या धडधडणाऱ्या हृदयात..*
*तुझ्यावर मनापासून प्रेम केले,*
*जे काही देऊ शकलो त्याच्यासह,*
*जगता जगता आयुष्याने मात्र वेगळे केले,*
*जगणे कठीण केले...*
*एकत्र जगलेले क्षण,*
*किती मौल्यवान, पण किती कमी,*
*त्यांची केलेली जपवणूक*
*पण तरीही गमावण्याची धास्ती मनात ..*
*माझ्या त्या शांततेबद्दल,*
*न बोललेल्या शब्दांबद्दल माफ करशील मला,*
*ज्या ज्या वेळी मी तुला अपयशी ठरवले,*
*त्या तुझ्या अश्रूंसाठी...*
*कुठलेच कारण नसताना*
*निर्माण झालेल्या त्या अंतराबद्दल,*
*अवकाश म्हणत म्हणत*
*जणू काही आकाशा एवढी पोकळी निर्माण करण्याबद्दल*
*माफ करशील मला*
*अदृश्य गोंधळात हरवलेल्या प्रेमाबद्दल...*
*पुन्हा लिहूया,*
*नव्याने*
*शब्दाने*
*रंगाने...*
*प्रकाशाकडे परतण्याचा मार्ग शोधूया..*
No comments:
Post a Comment