Monday, June 16, 2025

प्रेम...

 प्रेम म्हणजे केवळ शब्द नव्हे,

असतो हृदयातून वाहणारा 

शांतसागराचं प्रवाह!


नजरेतून उमटलेली एक 

हास्य लहर,

शब्द नसेल तरी मन ओलावून जातं 

त्यात क्षणभर !

प्रेमाचं नातं म्हणजे 

एक झाड विश्वासाचं,

जे, काळजीने, समजुतीने, 

#गोड संवादात

वाढतं हळूहळू


कधी फुलतं, कधी सुकतं, 

पण पुन्हा बहरतं,

कारण त्याचं मूळ हवेत नसतं 

असतं खोल आपुलकीत रुजलेले !!

एकमेकांच्या चुका समजून घेणं,

भांडणानंतरही हातात हात घेऊन चालत राहणं, 

प्रेम म्हणजे परिपूर्णतेचा शोध नाही,

अपूर्णतेत सौंदर्य शोधणं, आणि त्या अपूर्णतेवर प्रेम करणं!!


कधी-कधी एक साधी कुजबुज पुरेशी असते,

"तू आहेस" हे ऐकायला, आणि मनभरून हसण्यासाठी !

प्रेम म्हणजे अवाजवी असं काहीच नसतं,

ते असतं ते फक्त खरेपणाचं साथ देणं !


#मनांवर प्रेमाचं अबोल गाणं सतत वाजतं — मंद, पण गहिरे!

No comments:

Post a Comment