Monday, August 5, 2024

प्रश्न उत्तर

पापण्या मिटतो न मिटतो 
आभास तुझाच .. 

प्रत्येक श्वासागणिक  
आस तुझीच 
 गंध तुझाच 

वाट बघत असताना 
का मन असत तिथेच 
स्तब्ध 

भावना का असतात  
गोठलेल्या ?
डोळे का बरे असतात 
नि:शब्द ?

 सांजवेळ का अजुनही  
धूसरच ?
पाऊस पडला जरी 
का अजूनही कोरडाच ?

हलकासा तुझा तो स्पर्श 
अजूनही ओलसर 

जणू काही 
पुस्तकात ठेवलेले पान 
अजूनही ताजेच 


थंडगार हृदय माझे 
का श्वास मात्र उष्ण?
 

प्रत्येक प्रश्नच उत्तर असूनही 
प्रत्येक उत्तरमागे 
प्रश्न का ?

No comments:

Post a Comment