Friday, August 16, 2024

हिशोब

काय चुकलं माहीत नाही,

हिशोब कसलाच जुळत नाही,

स्वप्ने मोजत राहिलो मी

किती पूर्ण किती अपूर्ण, कळत नाही ...

मोठ्या कष्टाने बांधल्या चार भिंती,

कमाल मर्यादेत सुशोभित केलं सर काही

अजूनही आश्रीतच वाटतो,

घर असेल कसं? कळत नाही ..

अहंकाराची सावली पसरली,

संवादाचा दुवा गमावला,

द्वेषाने दोषाचीच उठाठेव सारी

सुख शोधाया कोण ? कळत नाही ..  

स्वप्नांची दुनिया आज पुन्हा फुलली,

हरवलेल्या गोड आठवणी,

आठवताना उदास हृदयी

कधी तो सूर्योदय? कळत नाही ...

No comments:

Post a Comment