Saturday, November 30, 2024

त्याग

काल फुलवंती पाहिला..

एक सुंदर चित्रपट..सौंदर्य  कला, संगीत, नृत्य, अभिनय , दिग्दर्शन आणि शेवट.

ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला डोळ्याने दिसतील..कोणाला आवडतील  कोणाला नाही. पण शेवट हा भावतो.
तो सुद्धा प्रत्येकाला पटेल असा नाही च. कारण ह्या चित्रपटाचा शेवट हा प्रत्येकाच्या मनाच्या विचारशक्तीवर आहे.

खरंच हे असं होऊ शकतं?
एवढं प्रेम कोणी करू शकत?
प्रेमासाठी एवढा त्याग कोणी करू शकतं?
ते प्रेम मिळावं म्हणून सर्वस्व पणाला लावू शकतं? 
ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीच्या भल्यासाठी सर्वस्व पणाला लावत का कोणी?

फक्तं एकमेकांवर प्रेम आहे हे पुरेसे आहे..ती जाणीव पुरेशी आहे जगायला...ती जाणीव, ते सत्य जगण्यासाठी प्रेरणा देणारं आहे. 
इतकं उत्कट प्रेम तीच...

वाह !!!

प्रेमात पडून , सर्वस्व पणाला लावून , तिच्या भल्याचा विचार करून स्वतः मनावर दगड ठेवून त्याग आणि कर्तव्य ह्याला निवडणारा तो..

वाह !!!

हे ज्याला जमले तो खरच महान. 

आणि असे प्रेम आयुष्यात येणे तो माणूस नशीबवान च.

 ह्या चित्रपटाचा शेवट हा प्रत्येकाला वेगळा उमगतो ..भावतो.



Wednesday, November 27, 2024

एकटेपण...

माणूस किती एकटा असतो हे त्याला च माहीत असतं... त्याचं एकटेपण त्यालाच जाणवत.

कितीही माणसांमध्ये वेढलेला असेल तरी तो एकटा असू शकतो.

मला शांतता सहन नाही होत..संवाद हवा असतो आणि तो नसला की मी बेचैन होते.
हे माझं एकटेपण!!!

He do not talk much..when he talks I listen, ask questions to make it interactive.

I talk a lot...But he is not interested in my topics..be it office , friends or relatives.

मग ते संभाषण तिथेच थांबत. If i start a conversation, i ask questions just to initiate the conversation, माझ्यावर ओरडल्या जातं.

का मी अशी आहे?
का मी शांत नाही बसू शकत?

I wish एकदा च माझं तोंड बंद व्हावं मग कोणाला त्रास देणार नाही मी.

:(  :(


Thursday, November 21, 2024

हम उन्हे याद करते गये 
और वो याद आते गये 
तन्हाई मे भी उन्होंने साथ निभाया 
बेईंतेहा प्यार उन्होंने हमसे किया..

गलती हमारी ही थी 
उम्मीदें हमने बेहिसाब रखी 
वो भी क्या करते ..
इन्सान के बस की बात नहीं थी..

हमारे पैगाम पढो, उसपे गौर भी करो
इतना ही नही उनका जवाब भी दो..
प्यार का इझहार करो 
वो भी अल्फाझो मे



ऐसे कौन करता हैं..प्यार में ये सब कहां होता हैं?






Tuesday, November 12, 2024

कर्म...

आजूबाजूला इतक्या negative गोष्टी ऐकिवात येत आहेत..मन सुन्न होत.
असं वाटतं, काय असेल विधात्याच्या मनात...का होतंय हे त्यांच्या सोबत...
त्यांचे भोग  त्यांची चूक की कर्म मागच्या जन्मीचे.

पण त्या सोबत त्यांच्या जवळचे  त्यांच्याशी related लोक ही impact होतात. हे सुद्धा त्यांचे कर्म?

सगळ्या प्रश्नाचं उत्तर "कर्म" च असतं का?

मग प्रश्न पडणं च चुकीचं आहे का?