Saturday, November 30, 2024

त्याग

काल फुलवंती पाहिला..

एक सुंदर चित्रपट..सौंदर्य  कला, संगीत, नृत्य, अभिनय , दिग्दर्शन आणि शेवट.

ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला डोळ्याने दिसतील..कोणाला आवडतील  कोणाला नाही. पण शेवट हा भावतो.
तो सुद्धा प्रत्येकाला पटेल असा नाही च. कारण ह्या चित्रपटाचा शेवट हा प्रत्येकाच्या मनाच्या विचारशक्तीवर आहे.

खरंच हे असं होऊ शकतं?
एवढं प्रेम कोणी करू शकत?
प्रेमासाठी एवढा त्याग कोणी करू शकतं?
ते प्रेम मिळावं म्हणून सर्वस्व पणाला लावू शकतं? 
ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीच्या भल्यासाठी सर्वस्व पणाला लावत का कोणी?

फक्तं एकमेकांवर प्रेम आहे हे पुरेसे आहे..ती जाणीव पुरेशी आहे जगायला...ती जाणीव, ते सत्य जगण्यासाठी प्रेरणा देणारं आहे. 
इतकं उत्कट प्रेम तीच...

वाह !!!

प्रेमात पडून , सर्वस्व पणाला लावून , तिच्या भल्याचा विचार करून स्वतः मनावर दगड ठेवून त्याग आणि कर्तव्य ह्याला निवडणारा तो..

वाह !!!

हे ज्याला जमले तो खरच महान. 

आणि असे प्रेम आयुष्यात येणे तो माणूस नशीबवान च.

 ह्या चित्रपटाचा शेवट हा प्रत्येकाला वेगळा उमगतो ..भावतो.



No comments:

Post a Comment