Sunday, July 5, 2020

रंग ......



तू भेटलास आणि थेट नजरेने बोललास
किती भावना एकदम जमा झाल्या म्हणून सांगू
सगळ्यांचा एकच गोंधळ उडाला..
आसमंत जणू रंग खेळला...

तुला वाटेल...
मी माझ्या मनाबद्दल बोलतेय..
चल वेड्या, ते तर अजून परत आलंच नाहीये 
आपल्या भेटीनंतर.....

आकाश ही शोधू पाहतेय त्या वेड्या मनाला...
रंगाचे चोचले दाखवून..

पण आकाश ही विसरलंय की
ते तर आधीच रंगून गेलाय तुझ्या रंगात ..

कधीपासून...ह्याहून ही सुंदर!!!!

- तू जा



No comments:

Post a Comment