Sunday, July 5, 2020

आयुष्य किती सोपं असतं

म्हंटल तर खरच
किती सोपे असते आयुष्य

मनाचे ऐकावे की डोक्याचे
हयात उडतो सारा गोंधळ
आयुष्य चुकत आणि
उगाच करतो आपण भांडवल

मन मारलं की झालं ना..
डोकं बाजूला ठेवलं की संपलं ना...

खरंच किती सोपं असतं आयुष्य    |१|

अपेक्षा आणि समजूतदारपणा हे ही त्रास देतात म्हणे
पहिली वाढत जाते आणि दुसरा मिस्सिंग चं असतो म्हणे

अपेक्षेला कधी पूर्णत्व लाभलंय का बरं ..
भक्कम समजूतदारपणा आपल्याकडे असला की झालं..

खरंच किती सोपं असतं आयुष्यं    |२|

नवीनच प्रकार आलाय आजकाल बाजारात..
व्यक्तिस्वातंत्र्य आणि आत्मसन्मान..
जपायचे असतात ह्मणे जीवापाड

कसलं स्वातंत्र्य आणि कसला सन्मान
रोबोट आपला करतोच की सगळं गपगुमान..

खरंच किती सोपं असतं आयुष्य   |3|

इगो आणि डीबेट तर नुसती वाट लावतोय
प्रत्येक जण उराशी घेऊन कवटाळून बसतोय

अरे, 'मी चुकले' म्हंटल की झालं..
दर वेळेस आपलंच पारडं झुकवलं की झालं

खरंच किती सोपं असतं ना आयुष्यं |४|

No comments:

Post a Comment