Monday, July 28, 2025

चैत्र

दुःख सहन करायला निघालो,  
तर सुखाचा पूर हसत हसत येतो!  
आनंद सावरता सावरता,  
अश्रूंचा मोती हाती चमकतो.  

ही विचित्र रीत जगाची -  
जे धरायचे ते सरते, 
जे सोडायचे ते चिकटते.  

ऊन हवे तर सावली मिळते,  
सावली शोधता भाजून जातो!  

म्हणून आता मी रडत रडत,  
माझ्या जगण्याला "चैत्र"  म्हणतो!

No comments:

Post a Comment