Monday, March 30, 2026

विरोधाभास

ग्रीष्म ऋतूत पाऊस पडेल 
भर उन्हात इंद्रधनुष्य  दिसेल 
वळवाचा पाऊस हिवाळ्यात पडेल,
समुद्राच्या लाटेवरही आग पेटेल.

उष्ण सूर्याखाली होईल चांदणे,
फुलं काट्यांवर पुन्हा उमलतील
भर उन्हात चांदणं दिसेल 
कधी शितल आगीसारखा भास होईल...

डोळ्यांत हसऱ्या अश्रूंना वाट करून देता येईल,
जिवंत मरणासारख्या क्षणांना पुन्हा एकदा जगता येईल 
हा विरोधाभास निसर्ग मान्य करेल.
पण तू मला भेटणे...हे अशक्यप्राय का आहे??

No comments:

Post a Comment