Thursday, June 20, 2024

तुझी सोबत

तुझी सोबत असेल,
तरच आता 
जीवनात सुख असेल,
बरसात असेल तीही अविरत ..

माहीत नाही खरच 
प्रेम काय आहे ?
ते मला जन्मो जन्मी हवयं
 जर ते तुझ्या इतकं सुंदर असेल!!!

रात्री एकटच झोपल्यावर हळूच
छातीवर फुंकर घालणारी बोचरी थंडी ...
झोपेच्या प्रयत्नात हजारदा
बदललेली कुशी ...
अन शेजारीच पडलेली
आणखी एक उशी.

चांदण्यात राहणारा मी नाही,
भीतींना पाहणारा मी नाही
तू असलीस नसलीस तरीही
शून्यात तुला विसरणारा मी नाही

No comments:

Post a Comment