Monday, June 10, 2024

तुझी आठवण

आठवणींच्या साठवणीत

होते खूप काही..

उघडताच ते गाठोडे

बिखरले सारे माणिक-मोती..

एक-एक कप्पा

हळूहळू खोलला..

पाहताच सारा पसारा

भूतकाळ उभा राहिला..

तुझी ती पत्रे सारी

उराशी कवटाळली..

कळलेच नाही मला

कधी त्या आठवणींत मी ओलीचिंब झाली..

एक एक पान

पुन्हा नव्याने उघडले..

तुझ्यासोबत जगलेले

ते सारे क्षण आठवले..

आठवून ते दिवस

गाली हसू उमटले..

पण प्रेम हे आपुले

असे का अपुरेच राहिले..


ही आत्म स्तुती किँवा आत्म मुग्धता नव्हे
प्रत्येकाचं आयुष्य हे त्या त्या व्यक्तीसाठी अगदी सहज सरळ असतं
पण तसं असूनही आपलंच आयुष्य किती खडतर आहे हीच भावना रुजलेली
त्याचवेळी इतर कोणाचं आयुष्य समजायला महाकठीण
पण तरीही त्याचं आयुष्य किती सहज सुंदर सोप्पं हीच भावना रुजलेली
मानवी स्वभावाचे अनेक प्रकार
त्याचा प्रत्येकजण शिकार
रागाला जींकशील
अस्वस्थतेला जिंकशील
असहायतेला जिंकशील
एवढेच नव्हे
आगतिकतेला जिंकशील
ते फक्त प्रेमाने, संयमाने..

No comments:

Post a Comment