Monday, June 10, 2024

अर्धवट

तू प्रेमाच्या गप्पा कर...नाहीतर चीड
पण अश्या कोरड्या गप्पा नको मारुस..

तू मनसोक्त बरसत रहा
किंवा मला दुष्काळात सोडून जा..
पण असं रिपरिप नको पडूस..

तू प्रेम कर किंवा तिरस्कार कर
पण असं अलिप्त नको राहुस 


तू व्यक्त हो किंवा अबोला धर..
पण असा गायब नको राहुस...


एकूण काय....

तू माझ्या आयुष्यात रहा किंवा निघून जा...
पण असा अर्धवट नको राहुस...
....,.............
तू सोबत नसलास की...

काय होत ...

मी अधांतरी असते
मी बेचैन असते
मी अपूर्ण असते
मी माझी च नसते


तुझ प्रेम खूप मोठं,महान...
माझं प्रेम साधारण , लहान


तुला मी सोबत नसली तरी चालते..
तू प्रेम करायचं थांबत नाहीस..

पण मला तू हवा असतोस...
नसला की मी भरकटते,
तरसते..

असे माझे मलाच लाचार झालेले  बघून...
मी स्वतःचा च तिरस्कार करते

No comments:

Post a Comment