का तुझी ओढ इतकी राणी कळत नाही
का तुझ्या आठवणीनेही मन भरत नाही ...
तुझा मंजुळ आवाज हृदयापलीकडे जातो
तरी ऐकण्याची तृष्णा मात्र भागत नाही ...
प्रत्येक श्वासागणिक तू जवळ येत आहेस
तरी मन माझ विचारण्यास धजत नाही ...
मनचक्षूंनी तुला नखशिखांत पाहिलंय
तरी डोळ्यांनी बघण्याची इच्छा जात नाही ...
नेईन म्हणतो तुला क्षितीजापलीकडे
पण अंतर आपल्या दोघातलं सरत नाही .
चिरंतन टिकणारा एखादा वाटवृक्षच असेल
पाण्याच्या शोधात खोल भूगर्भात जाणारी मुळे असोत
प्रकाशाच्या शोधात उंचच उंच जाणारी झाडे असोत
प्रकाशात न्हाऊन निघून अंधार जसा दूर व्हावा
पहिल्या वाहिल्या प्रेमाच्याच शोधात असणाऱ्या मला
जणू काही पावसातच चिंब भिजवणारी तुझे प्रेम
वटवृक्षासम मम चिरंतन भासणारे तुझे प्रेम
जीवनास नवा आयाम प्राप्त करून देणारे तुझे प्रेम
निसर्ग सौंदर्याने नटलेलली तू अन तुझे प्रेम
नसतेस तेव्हा जणू काही समुद्रा काठची भयावह शांतता
पण तरीही असणारे तुझे प्रेम
आरशात प्रतिबिंबित
व्हावे असे तुझे रूप नाही
देहाचा सुगंध तुझ्या
कस्तुरीलाही पेलणार नाही
तुझ्या भेटीचा आनंद
मनातही मावेना
पापण्या उघडणे शक्य नाही
भीती वाटते आनंद कुठे ओसंडू नये
..
No comments:
Post a Comment