Monday, June 10, 2024

तू...

*इथे किंवा तिथे*
*दोन्ही जगांत तुझ्या प्रेमात हरवलेला मी*
*पाहतो आहे*
*निर्जन असलेला, अथांग पसरलेला* 
*भयावह सौंदर्याचा आभास असलेला* 
*उदास झालेला तो समुद्र .....* 
*तु नाहीस म्हणून वसंतात ही हिरमुसलेला तो ..* 

*कुठला तरी गुन्हा करावा मुद्दामहून*  
*संधीही मिळाली* 
*तुझे नि माझे धाडस* 
*हृदयाशी आहे कवटाळून*

*तुझ्या आठवणीत* 
*रमलेल्या मला* 
*जणू काही जगाने ही* 
*ओळख द्यायला बंद करावी   ........* 


*आज चुकूनच हसू आलं ओठांवर* 
*आठवणीत तुझ्या* 
*पिळवटून टाकणाऱ्या हृदयाबद्दल*
*विचारू नको ...*

No comments:

Post a Comment