आज तू भेटलास
कित्ती दिवसांनी...
ह्या आधीही बरेचदा दिसलास..
दुरून दर्शन देऊन जात होतास जणू....
मला विचारत होतास जसा...
विसरलीस का मला..
दुरून मला बघून ही
न्याहाळत होतास मात्र जवळून..
आणि शांत होतास...
आज मी सैरभैर असताना...
आलास च मला भेटायला...
आणि भेट झाली थेट..
अगदी गळा भेट..
चिंब भिजवून जणू शांत करायला आलास..
आज तो मला भेटला..
तो...मी आणि पाऊस.
No comments:
Post a Comment