Thursday, June 27, 2024

तू

तू..

तू कोण आहेस..


तू आहेस ..


तू आहेस ..
 उन्हाळ्यानंतर आलेली पावसाची एक सर

तू आहेस..
पावसाळ्यातील इंद्रधनुष्य

तू आहेस..
कंटाळवाण्या दिनचर्येतील एक क्षण विरंगुळयाचा

तू आहेस..
साऱ्या फळांमधील हापूस आंबा

तू आहेस..
रोजच्या जेवणातील गोड पदार्थ

तू आहेस..
रोजच्या जेवणातील चविष्ट लोणचे

तू आहेस..
गुलाबी थंडीतील उबदार गोधडी

तू आहेस..
उन्हाळ्यातील गर्मीतले थंडगार पाणी

तू आहेस..
रात्रीच्या आकाशातील चांदणं 

तू आहेस..
पहाटेच्या वेळचा मंजुळ पक्ष्यांचा कुंजरव 

तू आहेस..
क्षितिजावर पसरलेला संधिप्रकाश

तू आहेस..
माझ्या आयुष्यरुपी वाळवंटातील मृगजळ


No comments:

Post a Comment