प्रेम खरंच काय असत ?
जरासं काही आठवल
की न कळत अश्रु येतात डोळ्यात
जरा दुरावा वाढला
की मन कासाविस होतं
येणारी आठवण
मग थांबवावी कशी ?
न बोलण्याने
ती काही थांबणार आहे का?
प्रेमात असणाऱ्या
हृदयात असणाऱ्या
जीवलगाला
प्रेमाला
भलेही जगपसून लपवणार ..
मनातूनच पुन्हा मनात डोकावणाऱ्या
आठवणीला कसे थांबवणार ?
आठवणीत तुझ्या, कविताही सुचत नाही, शब्द जोडत जातो, मात्र अर्थ लागत नाही
कळत नाही मला, तुला कसं सांगू, श्वासाला नाही म्हणून, जीवन कसं जगू
No comments:
Post a Comment