Friday, November 14, 2025

कसा आहेस

कसा आहेस रे ?

मजेत च असतोस तू..ठाउक आहे मला!
फारसे मनाला लावून न घेणारा अणि 
आयुष्य आनंदात जगणारा नाही का तू?
विसरलेच  😀

पण..रोज सकाळी 'जेव्हा" तू मला गुड मॉर्निंग मेसेज करायचास...'आता' त्या  वेळे ला चुकल्या चुकल्यासारखे वाटते का रे ? 

आपण भेटलो ते ठिकाण,  त्या जागा, 
जिथे आपण बरीच स्वप्नं पहिली..
तिथे गेलास की  पोटात गोळा येतो का रे?

ती  वळणे....
जिथे आपण  नजर भेटी साठी 
मुद्दाम रेंगाळायचो..
तिथे पोचल्यावर मनात धडधड वाढते का रे?

तो कट्टा जिथे आपण सगळे उनाडक्या करायचो 
पण तरीही नजरेने एकमेकांशी बोलायचो ...
तिथे बसल्यावर मन उदास होत का?

कुठलीही love story पाहिली की  relate होते का रे ?

मला होते हे सगळे...!!

कुठलीही गोष्ट तुटली की ती जोडता येत नाही..
मन तरी त्याला अपवाद कसे असेल..








Friday, October 24, 2025

*मी तिथेच उभा असेन...*

*मी तिथेच उभा असेन...*

कुठून सुरुवात करू?
कदाचित त्या क्षणापासून —
जेव्हा तुला पहिलं होतं,
आणि सगळं थांबल्यासारखं झालं होतं.

तू आवडलीस —
सुरुवातीला फक्त नजरेने,
नंतर हृदयाने,
आणि शेवटी — आत्म्याने.

ते एकतर्फी प्रेम होतं,
महिने, वर्ष नव्हे — तर दशकांपर्यंत पसरलेलं.
कधी फिकं न पडलेलं,
कधी मलिन न झालेलं —
जणू काळाच्याही पलीकडचं एक अघटित नातं.

आणि मग एक दिवस —
तो हवाहवासा, पण स्वप्नवत असणारा दिवस उजाडला.
तू माझ्यासमोर उभी होतीस.
फक्त भेटलीस नाहीस —
तर जणू माझ्या स्वप्नातूनच समोर अवतरलीस.

त्या भेटीत काहीतरी जादू होती...
जणू नव्या विश्वाचा एक दरवाजा उघडला,
ज्यात आपण दोघेच होतो,
वेळ, शंका, भीती काहीच नव्हती!!

त्या दुनियेत आपण हरवून गेलो,
दिवस गेले, महिने गेले —
कळलंच नाही.

पण जीवनाचं वास्तव नेहमीच सावल्यांसारखं मागोमाग येतं.
काही गोष्टी घडल्या...
मी गोंधळलो, घाबरलो,
थांबलो, आणि पुन्हा चालू लागलो...
पुन्हा काही घडलं, पुन्हा थांबलो...

आणि हळूहळू —
सुरुवातीचा तेजोमय संवाद मंदावत गेला...

तुला माझी  खूप गरज होती (आहे)—
पण माझ्याकडून जमेनासं झालं.
प्रयत्न प्रामाणिक होते, पण अपुरे.
आणि तेच खरं होतं.

संयम, प्रगल्भता — या शब्दांचा अर्थच मिटून गेला.
तू बिथरलिस...
तुझ्या अपेक्षा स्पष्ट सांगू लागलीस,
आणि मी — समजूनही काहीच करू शकलो नाही.

तू विचारलंस,
*समोरच्याला दुखावणार प्रेम, प्रेम असतं का?*
ते उत्तर मी आजही शोधतोय...
कारण, मुद्दाम नाही दुखावलं तुला —
दुखवूच शकत नाही मी तुला.

पण प्रश्न तेच,
उत्तरही तेच —
आणि तू कंटाळलीस त्या न संपणाऱ्या फेऱ्यांना!

प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करण्याची इच्छा होती,
पण प्रत्येक सुरुवात अपराध्यासारखी वाटायची.
संवादातही अपराधभावाची सावली पडली होती.

हो, चूक मान्य केली —
पण तिचं ओझं मात्र वाढतच गेलं.

तू खूप शिस्तबद्ध होतीस,
आणि तशीच अपेक्षा माझ्याकडूनही होती.
तुमचं जेवणानंतर एकत्र टीव्ही पाहणं असो,
किंवा वेळेचं बंधन पाळणं —
मी त्या क्षणांचा, त्या पद्धतीचा अगदी मनापासून आदर केला,
पण त्या पद्धतीनं जगणं मला जमलं नाही.

मी प्रयत्न केले — अनेक वेळा —
*पण मी कदाचित ऋतूसारखाच आहे...
*कधी मुसळधार, तर कधी पूर्ण कोरडा...*

आता तू जो काही निर्णय घेतलास —
आणि तो योग्यच असेल कदाचित.
*दशकांपासून ज्या गोष्टीची वाट पाहिली, त्याचा शेवट होणं असह्य आहे!* —

पण त्याच वेळी,
तुला होणाऱ्या दुःखाला मीच कारण असणं,
हे अधिक असह्य आहे.

खोटी आश्वासने मी देऊ शकत नाही.
तू मला ओळखतेस —
माझ्या ऋतूंसकट.

आता निर्णय तुझाच आहे —
घे, तुलाच घ्यावा लागेल.

आणि मी...
मी तिथेच उभा असेन —
जिथे तुला प्रथम पाहिलं होतं,
त्याच शांततेत,
त्याच प्रेमानं,
आणि त्या न बोललेल्या शब्दांमध्ये...
तसाच... नेहमीसारखा... तुझाच.

Saturday, October 18, 2025

एकदा भेटायचे आहे

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या डोळ्यात खरच माझ्यासाठी प्रेम दिसते का  
ते बघायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून तो सुकून अजूनही मिळतो का 
ते बघायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या मिठीत मी आजही हरवते का 
ते बघायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळाली च नाही  
ती ऐकायची आहेत ..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
माझ्या मनाला भिडलेले ते गाणे ऐकून तुला काय वाटले होते 
ते ऐकायचे आहे ..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
खरच का बोलणे बंद केलेस माझ्याशी 
ते ऐकायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
बोलणे नव्हते पण आठवण यायची का तुला माझी 
हे विचारायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
आठवण येत होती मग तरीही बोलणे का होत नव्हते 
हे विचारायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
डोळे बंद केलेस की तू डोळ्यासमोर येतोस. ते येणे बंद कर. 
हे ठणकावून सांगायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तू दिलेल्या प्रेमाच्या आणाभाका,  स्वप्नं, आशा...
परत करायच्या आहेत..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
प्रेम खूप होते पण तरीही..पण तरीही कुठे बिनसले..
हे माहीत करून घ्यायचे आहे..


तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे...
अपुर्ण राहिलेल्या ह्या नात्याला एक पूर्णविराम द्यायचा आहे..

तुला एकदाच शेवटचे भेटायचे आहे..
तुला एकदाच शेवटचे भेटायचे आहे !

-  ऋ  तू  जा 

Wednesday, September 24, 2025

शुल्लक

त्याचे माझ्यावरचे प्रेम अगदीच शुल्लक होते,
त्याचे संपले केव्हाच होते , माझे मात्रं अजून शिल्लक होते,
हसते मी कधी कधी ह्या माझ्याच लाचारीला,
त्याच्याकडे मात्र हे घातक मौन अजूनही मुबलक आहे,
मीही आता टाळते आहे रोज त्याच्या आठवणी,
कळले मला आता माझीच  कुठेतरी गल्लत होत होती ..

Monday, September 22, 2025

किती वेळ वाट बघायची मी


किती वेळ वाट बघायची मी…

ह्या ऋतूत  पाऊस  थांबण्याचे  नाव घेत  नाहिये कदाचित आपण भेटू ही आशा त्यालाही असेल का पावसाचे थेंब खिडकीवर ओथंबलेले                       पण तुझी पाऊलखूण दूरवर सुद्धा नाही…


मनातही ओल वाढलीये,
बाहेरसारखीच…
फरक एवढाच—
तिथे पाऊस आनंद देतोय 
इथे तो प्रश्न  विचारतोय.

रात्र सरायला तयार नाही,
कारण संवाद अडकलेत
आपल्या दोघांच्या मध्ये...ते  पूर्ण करायला तरी ये  .


स्वप्नंही आता बुचकळ्यात पडलेत.                       खरंच का तू फक्त तिथेच असतोस?

माझच हसू माझ्याशी बोलतं—
“अर्धवट का जगतेस?
पूर्ण का नाही हसत?”

आणि मी पुन्हा त्याच प्रश्नासमोर—
किती वेळ वाट बघायची मी?


- ऋतुजा 


किती वेळ वाट बघायची मी



किती वेळ वाट बघायची मी,
तुझी भेट होईल म्हणून,
ढगांनीही थांबून धरलेत अश्रू,
पावसाचा नाद थांबतच नाही.

बाहेर टपटप थेंब पडतात,
आणि आत मनातही गारवा दाटतो,
पण तुझ्या एका शब्दाशिवाय
हा गारवा कधी कधी काटा होतो.

रात्रही लांबत चाललीय,
जणू चंद्रालाही माहितीये—
आपले संवाद अर्धवट राहिलेत,
आणि माझ्या डोळ्यांत प्रश्न झोपलेत.

स्वप्नंही घाबरून विचारतात,
“आपण खरंच फक्त स्वप्नापुरतेच का?”
आणि हसू, जे मनाला उचलून नेतं,
तेही आता दाराशी थांबतं.

ते विचारतं—
“इतकं मोजून मापून का हसावं?
हृदय अर्धवट का थांबावं?”

सांग ना...
किती वेळ वाट बघायची मी,
तुझ्या पावलांच्या त्या एका आवाजासाठी...



Thursday, September 18, 2025

आठवण

कधी कधी शब्द संपतात, 
पण आठवणी संपत नाहीत…
कधी कधी ओठ शांत असतात, 
पण हृदय ओरडतं…..
कधी कधी आपण हसतो, 
पण आतून तुटून पडतो…
खरं सांगायचं तर, 
नातं किती दिवस टिकतं हे महत्त्वाचं नसतं,
पण ते नातं आपल्याला किती जिवंत ठेवतं हे महत्त्वाचं असतं.......
आजही तुला आठवलं की,
डोळ्यांच्या काठावर पाणी थांबत नाही,
कारण तू फक्त व्यक्ती नाहीस…..
तू आठवण झाला आहेस…
आणि आठवणी कधीच मरत नाहीत......

Sunday, September 14, 2025

Saiyara

A movie...which everyone loved..not o ly loved but took on their heart...

Something has to be there which connected these audience...

I watched it and not gonna lie..I liked it !!
Obviously I watched it on OTT a d in a single go ( yes, that's an achievement for me because generally I dont get time at a stretch to watch 2, 2.5 hrs movie in a single sitting) 

1. Movie is nice, romantic , love drama at its peak.
2. All songs are superhit and has good lyrics too which connects to emotional person. Background music keeps you connected to rhydum of the love mood.
3. Lead actors are fresh , cute and with ok acting skills.
4. No side tracks to original love story which gives more impact and focuses audience on only the love story
5. Last but not the least definitely ..while watching a movie if you cry...
you dont see Vani and Krish...but your lost love !! 
In a movie there is a dialogue..

Music  ऐसे नही hit बनता है,  wo गाने जो दिल को छु जाते है...उनके पीछे एक moment होता है...हम  उस moment मे चले जाते है जो हमे past मे  le जाता है ..time travel..wo स्पेशल moment, wo special insan , wo पहला प्यार !!!

Bass..this is the success key of the movie.

  -- ऋतुजा 

Tuesday, September 9, 2025

कारणे

कधी हे  कारण,  कधी ते कारण देणे 
कारणे देऊन स्वतःला guilt free करणे 
 आणि  लगेच दुसरे कारण शोधायला तयार
"प्रेम" हे  कारण  कधीच  नसते..
नाही  का?



Saturday, September 6, 2025

क्यु !

क्यु है अब भी  इतना  इनतेझार
 जब पता है की तुम नही आओगे

 क्यु  है दिल मे इतना खालीपन 
जब पता है तुम  वह भर नही पाओगे

क्यु फैलि है ये उदासी 
जब पता है तुम  खुशीया नही ला सकते 

क्यु है ये अकेलापन 
जब पता है तुम  साथ नही दे सकते 

क्यु !!




Saturday, August 2, 2025

नाते

एक ch आयुष्य आहे 
छान जगता यावे 
मिळालेले  सुंदर नाते 
अलगद जपता यावे

तू जपल्या तुझ्या भावना 
त्यालाच नाते समजून बसला 
नात्यात असतात दोन मने 
तुला दुसर्‍या मनाचा विसर पडला 

तू,   तूझा व्याप,   
तूझी  कामे , तूझा  वेळ 
माझ्या भावना अणि तुझी कारणे 
बसला च नाही  मेळ 




Tuesday, July 29, 2025

"जागं झालेलं प्रेम"



माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात
एक प्रेम लपून बसलं होतं—
अबोल, अस्पष्ट, आणि
स्वतःच्याच अस्तित्वाशी अनभिज्ञ...

तू आलास…
तुझ्या नजरेचा एकच स्पर्श,
आणि त्या प्रेमाने डोळे उघडले.
कसं सांगू तुला—
त्या क्षणी मी पुन्हा जिवंत झालो होतो.

तू शब्दांमध्ये रंग भरलेस,
हास्यांमधून आश्वासक शांतता दिलीस,
आणि हळुवारपणे माझं मन उलगडलंस—
जसं एखादं जुनं प्रेमपात्र उघडावं
अन त्यातून सुगंध दरवळावा...

पण नशीब…
त्याच क्षणी तू मागे वळलास,
शब्द न बोलता, स्पर्श न करताच...
आणि माझ्या आत साठलेलं प्रेम,
जे नुकतंच तुझ्यासाठी उघडलं होतं,
ते अश्रूंमध्ये विरघळून गेलं.

तुझं जाणं म्हणजे
जखमेवरची खपली निघणं होतं—
प्रेमाचं रक्त पुन्हा वाहू लागलं,
अन् हृदयाची धडधड पुन्हा वेदनेतून ऐकू येऊ लागली...

पण अजूनही...
त्या क्षणांच्या आठवणी माझ्यात जिवंत आहेत,
तुझ्या स्पर्शाची ऊब,
तुझ्या नजरेतील ओलसर शांतता...

खरं सांगू?
त्या क्षणी झालेलं दुखणं आजही गोड वाटतं,
कारण त्यामध्येही तू होतास...
आणि माझं प्रेम—
ते आजही तुझंच आहे.




खपली



माझ्यात कुठेतरी खोल दडपलेलं,
संवेदनांचं एक अव्यक्त गुपित होतं,
प्रेमाचं बीज होतं जरी,
तरीही त्यावर न बोलण्याचं मौन होतं...

तू आलास, नि त्या मौनाला सूर मिळाले,
माझ्या हृदयातील बंद दरवाजे उघडले,
जे मी स्वतःपासून लपवलं होतं,
ते तू सहज ओळखून जागं केलं...

त्या प्रेमाला शब्द मिळाले,
स्पर्श, हसू, नि अनाहूत ओलावा,
आणि अगदी त्याच क्षणी,
तू मात्र मागे फिरलास...शांत...निव्वळ सावलीसारखा.

तुझं जाणं म्हणजे जणू जखमेवरची खपली निघणं,
जी आत खोलवर जखम होती,  
ती पुन्हा ताजी झाली,
भळाभळा रक्त वाहू लागलं,
वेदना पुन्हा अंगात भिनू लागल्या...

आता ते थांबायचं नाव काढत नाही,
का थांबावं, ज्या क्षणी प्रेमानं स्वतःला उघडलं,
त्या क्षणीच तू गेलास,
आणि माझ्या आतल्या शांततेचा अंत झाला...

हे दुखणं आता थांबेल,
जेव्हा पुन्हा एक नवी खपली बसेल,
पण तीही कधीच जुन्या त्वचेइतकी मजबूत नसेल,
कारण आता तुझ्या जाण्याची आठवण कायमची तिच्यात राहील...

- ऋतुजा 



Monday, July 28, 2025

चैत्र

दुःख सहन करायला निघालो,  
तर सुखाचा पूर हसत हसत येतो!  
आनंद सावरता सावरता,  
अश्रूंचा मोती हाती चमकतो.  

ही विचित्र रीत जगाची -  
जे धरायचे ते सरते, 
जे सोडायचे ते चिकटते.  

ऊन हवे तर सावली मिळते,  
सावली शोधता भाजून जातो!  

म्हणून आता मी रडत रडत,  
माझ्या जगण्याला "चैत्र"  म्हणतो!

Wednesday, July 23, 2025

विण

प्रत्येक नाते हे एखादे विणलेले वस्त्रा सारखे असते. 

कधी रेशमी तलम ..हळुवार,  
तर कधी लोकरीच्या मफलर सारखे उबदार. 
काही नाते अगदी सुती कापडासारखे ..गरजेचे अणि त्यामुळे तेव्हढे च महत्त्वाचे. 

ही सगळी नाती तेव्हढी ch घट्ट अणि मजबूत असावी..

पण कधी कधी एखाद्या घटनेमुळे,  समोरच्याच्या वागण्यामुळे , तुम्हाला दिलेल्या वागणुकीमुळे एखादी vin निसटते..नकळतच..

त्या नात्याला vachawanya sathi  प्रयत्न नाही झाले तर ते नाते धोक्यात येते. 
आणि मग हळूहळू एक एक धागा निसटत जातो..ते बघताना सहाजिकच त्रास होतो..वेदनादायक असते ते..

अगदी शेवटचा धागा तुटेपर्यंत. 
तो एकदा तुटला की...राहते ती fact aoupcharikta...

Saturday, July 12, 2025

shabd

प्रेम म्हणजे केवळ उच्चारलेली काही वाक्यं नव्हे,
ते असतं अंतःकरणातून वाहणारं,
गूढ पण शांत असा भावनांचा सागर.

नजरेत दडलेली ती एका क्षणाची चमक,
हसण्यातून उमटणारी गोडसर लहर,
शब्द नसतानाही...
मन भरून टाकणारी मूक अनुभूती.

प्रेमाचं नातं –
ते असतं नाजूक, पण घट्ट,
जसं एका विश्वासाच्या झाडाला
जपून घालावं पाणी –
काळजी, समजूत, आणि संवादाचं खत.

ते झाड कधी फुलतं,
कधी सुकतंही…
पण पुन्हा नव्याने बहरतं –
कारण त्याची मुळे खोल रुजलेली असतात
आपुलकीच्या जमिनीत.

प्रेम म्हणजे चुकांना पुसून टाकणं नाही,
तर त्या समजून घेऊन पुढे जाणं –
भांडणं झाली तरी,
हात सुटू न देणं.

परिपूर्णत्व शोधण्यात प्रेम नाही,
तर अपूर्णतेत सौंदर्य पाहण्यात आहे,
आणि त्या अपूर्णतेवर मनापासून प्रेम करण्यात.

कधी फक्त एक हलकीशी कुजबुज पुरेशी असते –
"तू आहेस..."
हे ऐकण्यासाठी, आणि अंतर्मनातून हसण्यासाठी.

प्रेमात काही अतिशय विशेष नसतं,
फक्त असतो तो एक खराखुरा साथ देणारा हात.

मनामध्ये सतत वाजतं एक निःशब्द सूर –
प्रेमाचं अबोल गाणं…
हळवं, पण खोलवर स्पर्शून जाणारं.

apsara

काय त्या पावसाचं नशीब गं,
दरवेळी तुझ्यासोबतच का बरसावं त्याला हवं?

साडीत तू, हलक्याशा पावलांनी
जणू नभातून उतरलेली अप्सरा ...

हवेच्या सुसाट झुळुकांनी घेतला तुझा गंध,
आणि वातावरणात झरला एक अनाम रास…
पण गं, खरं सांगू?
त्या क्षणात साऱ्या नजरा थांबल्या,
फक्त माझीच नव्हे… सृष्टीचीसुद्धा!

तुझ्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं,
जणू शब्दांशिवाय पोचणारा एखादा गूढ मंत्र…
ते पाहून पावसाचंच भान हरपलं,
आणि माझं मन?
ते तर तुझ्या एका हसण्यातच हरवून गेलं!

Monday, June 16, 2025

Coffee

 तुझ्या डोळ्यांत जणू काळी मखमली, 

जशी सकाळची पहिली कॉफी थोडीशी उष्ण, थोडीशी थंड ! 

तुझ्या हसण्यातला तो गोड स्वाद, 

जणू साखरेच्या कणांत लपलेला प्रेमाचा परसदार !


तुझ्याशी बोलताना हळूहळू मिसळत जातं,

जसं दूध आणि कॉफीचं अद्वैत एकत्र !

तुझा स्पर्श, तुझं जवळ असणं,

जसं उबदार कपातलं प्रत्येक घोट घेणं !!


पावसाच्या थेंबांत तू,  

आणि हातात कॉफी,

त्या वाफाळत्या क्षणांत 

फुलतं आपलं काहीतरी नवं !!!


तुझ्याशिवाय कॉफी नुसती कडवट,

तसंच माझं आयुष्य अधुरं, शांत नी रुक्ष !!!!


कॉफीचा कपहोतो तुझ्या प्रेमाने गोड,

तू जवळ असताना वाढते एक अनामिक ओढ !

प्रत्येक सकाळी तुला आठवत

घेतो प्रेमाच्या सुगंधात भिजलेली कॉफी !!!!!

प्रेम...

 प्रेम म्हणजे केवळ शब्द नव्हे,

असतो हृदयातून वाहणारा 

शांतसागराचं प्रवाह!


नजरेतून उमटलेली एक 

हास्य लहर,

शब्द नसेल तरी मन ओलावून जातं 

त्यात क्षणभर !

प्रेमाचं नातं म्हणजे 

एक झाड विश्वासाचं,

जे, काळजीने, समजुतीने, 

#गोड संवादात

वाढतं हळूहळू


कधी फुलतं, कधी सुकतं, 

पण पुन्हा बहरतं,

कारण त्याचं मूळ हवेत नसतं 

असतं खोल आपुलकीत रुजलेले !!

एकमेकांच्या चुका समजून घेणं,

भांडणानंतरही हातात हात घेऊन चालत राहणं, 

प्रेम म्हणजे परिपूर्णतेचा शोध नाही,

अपूर्णतेत सौंदर्य शोधणं, आणि त्या अपूर्णतेवर प्रेम करणं!!


कधी-कधी एक साधी कुजबुज पुरेशी असते,

"तू आहेस" हे ऐकायला, आणि मनभरून हसण्यासाठी !

प्रेम म्हणजे अवाजवी असं काहीच नसतं,

ते असतं ते फक्त खरेपणाचं साथ देणं !


#मनांवर प्रेमाचं अबोल गाणं सतत वाजतं — मंद, पण गहिरे!

Saturday, May 10, 2025

द्विधा

 सोचती हूँ... तुम्हें, मुझे, और अपने इस रिश्ते के बारे में,

एक उलझी डोरी, कभी नरम, कभी तीखे धागे वाली।

बहुत सताती हूँ तुम्हें, जानती हूँ मैं यह बात,

कई प्रकार से, अनजाने में या शायद हालात।

कभी अनगिनत सवालों की बौछार करती हूँ,

कभी छोटी सी बात पर भी गुस्सा करती हूँ।

कई बार तुम शांत रहते हो, देखकर मेरी यह रीत,

मन में सोचते हो शायद, "यह कैसी है प्रीत?"

सोचती हूँ अक्सर, क्यों मैं तुम्हें छोड़ नहीं पाती,

क्या है यह बंधन गहरा, जो जाने नहीं देता साथी?

याद आती हैं वो रातें, जब तकिया गीला किया था,

कुछ आँसू ऐसे ही सूख गए, इंतज़ार करते-करते।

कुछ आँसू पी लिए मैंने, इस रिश्ते के प्यार के लिए,

एक उम्मीद की लौ जलाई, अपने दिल के द्वार के लिए।


तुझे प्रेम ठाऊक आहे, खूप वर्षांपासून

हृदयात जपले ते हळुवार कशातून

माझे काय? हा प्रश्न खोल रुजलेला

एकांताच्या गर्तेत, स्वतःलाच विचारलेला

आयुष्यात माझ्या एक पोकळी निर्माण झाली

प्रेमाच्या आधारासाठी नजर आसुसली

शोधते मी ती जागा, जिथे ऊब मिळेल

विरलेल्या स्वप्नांना पुन्हा रंगत येईल

तुझ्या प्रेमाचा आधार, जरी दूर असला

तरी मनात माझ्या एक हळवा कोपरा त्याला

माझे काय? या प्रश्नाचे उत्तर कधी मिळेल?

पोकळी ही भरून, मन शांत कधी होईल?

Thursday, April 3, 2025

चिंब bhijuya

*चिंब भिजूया* 
*तुझ्यात नि माझ्या अंतर नको,*
*तुझ्या गंधात हरवून,* 

*तुझ्या डोळ्यांत पाहताना*
*हृदयात गुंजू देत प्रीतीची गाणी* 
*तुझ्या स्पर्शाची आठवण,* 
*जणू एक हळुवार प्रेमगीत*
 *कधीही न संपणार* 

*चिंब भिजूया* 
*तुझ्यात नि माझ्या अंतर नको,*
*तुझ्या गंधात हरवून,* 

*तुला पाहिल्यावर*
*तुझ्या मिठीत हरवून जावं*
*जणू काही*
*जगणंही थांबून जाव* 
*तुझ्या सान्निध्यात..!*

*चिंब भिजूया* 
*तुझ्यात नि माझ्या अंतर नको,*
*तुझ्या गंधात हरवून,* 

*जणू तूच माझा प्रपंच,*
*माझ्या जगातील प्रेम,*
*तुझ्या जवळून भेटावा एक संकल्प*
*तुला समजून घेत,*
*स्वत: ला हरवून जाण्याचा*


*चिंब भिजूया* 
*तुझ्यात नि माझ्या अंतर नको,*
*तुझ्या गंधात हरवून,*

Tuesday, March 18, 2025

रात्र

*रात्रीच्या शांततेत,*
*तुझे नाव गुणगूणताना,*
*वाऱ्यातील एक कुजबुज,*
*एक थंडगार झुळूक...*
*शांततेतून जाणीव होणारी* 
*मैलो अंतरावर असणारी तु* 
*तू माझ्या श्वासात,* 
*माझ्या धडधडणाऱ्या हृदयात..* 

*तुझ्यावर मनापासून प्रेम केले,* 
*जे काही देऊ शकलो त्याच्यासह,*
*जगता जगता आयुष्याने मात्र वेगळे केले,* 
*जगणे कठीण केले...* 

*एकत्र जगलेले क्षण,* 
*किती मौल्यवान, पण किती कमी,*
*त्यांची केलेली जपवणूक* 
*पण तरीही गमावण्याची धास्ती मनात ..* 

*माझ्या त्या शांततेबद्दल,* 
*न बोललेल्या शब्दांबद्दल माफ करशील मला,*
*ज्या ज्या वेळी मी तुला अपयशी ठरवले,* 
*त्या तुझ्या अश्रूंसाठी...*

*कुठलेच कारण नसताना* 
*निर्माण झालेल्या त्या अंतराबद्दल,* 
*अवकाश म्हणत म्हणत* 
*जणू काही आकाशा एवढी पोकळी निर्माण करण्याबद्दल* 
*माफ करशील मला*
*अदृश्य गोंधळात हरवलेल्या प्रेमाबद्दल...* 

*पुन्हा लिहूया,*
 *नव्याने* 
*शब्दाने*
*रंगाने...*  

*प्रकाशाकडे परतण्याचा मार्ग शोधूया..*

Friday, January 24, 2025

तर तुझ वय झालंय !

प्रेयसी ला बोलण्याची इच्छा होत असेल आणि नुसत्या विचाराने ही तुझ मन भरत असेल तर..
तर तुझ वय झालंय !

प्रेयसी status ठेवतेय आणि तरीही तू ते बघत नसशील तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसी चा ठावठिकाणा जर तू विसरत असशील तर..
तर तुझ वय झालंय!

ह्या online जगात तू प्रेयसी ला स्टॉक करत नसशील तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसी ने पाठवलेल्या शेरो शायरी, reels, shorts बघायला तुला वेळ मिळत नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसीने dedicate केलेले गाणे, कविता ऐकायला तुला वेळ नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

संसाराच्या रहाटगाड्यातून प्रेयसी साठी तुला वेळ मिळत  नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

प्रेयसी च्या लाडिक रागावर तू तिला लेक्चर देत असशील आणि प्रेमाने मनवत नसशील तर..
तर तुझ वय झालंय !

प्रेमामध्ये प्रयत्न करावे लागत असतील आणि सहजता नसेल तर..
तर तुझ वय झालंय!

आणि....

जीव ओतून प्रेम करणारी प्रेयसी असेल
आणि तरीही तू कोरडा राहत असशील तर...
तर तुझ वय झालंय !


- ऋतुजा

Thursday, January 16, 2025

धर्म

धर्म ,जात

ह्या मुळी गोष्टी आपल्या हातात नसतात च. नाही का?  जन्म झाला की त्या आपल्याला assign होतात. त्या धर्माची, जातीची शिकवण आपल्याला मिळत जाते लहानपणापासून. आपण जसे जसे मोठे होत जातो तसे आपली इतर धर्म आणि जातीशी ओळख होत जाते.

प्रत्येक जण आपल्या धर्माचा समर्थक. 
पण प्रत्येकाने स्वतःचा धर्म खरंच जाणला आहे का? की fact जे लहानपणापासून सांगितले, कळले त्या प्रमाणे तो वागतोय ? किंवा आजकाल सोशल मीडिया वर जे काही उपलब्ध आहे त्या प्रमाणे भरकटतो आहे? 

कोणता धर्म original आणि प्रत्येक धर्म काय सांगतो ते कळण्यासाठी प्रत्येक धर्माचे ग्रंथ वाचावे लागतील.

हिंदू धर्म सांगतो सहिष्णू रहा..पण आजकाल कोण हिंदू सहिष्णू आहे

बुद्ध धर्म सांगतो मूर्ती पूजा करू नका पण सगळ्या मोठ्या मुर्त्या गौतम बुद्धाच्या आहेत .

मुस्लिम धर्म दहशतवाद पसरवायला सांगतो का? नाही  पण बहुतांश दहशत ही मुस्लिम लोक पसरवतात असा समज का आहे? 

धर्म जपणारे, धर्माचा प्रसार करणारे खरंच त्यांचा धर्मग्रंथ वाचून हे सगळं करत आहेत की fact वर वर चे ज्ञान आहे हे ? 

कोणत्या धर्मात असे लिहिले आहे की.. 
१. दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करा. 
२. दुसऱ्या धर्माच्या लोकांशी बोलू नका, व्यवहार करू नका , 
३. कोणतेही काम त्यांच्याकडून करू नका. ४. दुसऱ्या धर्माचे जे पूजनीय दैवत आहेत त्यांचे existence नाकारा.

कोणता धर्म असे सांगतो?


तुमच्या जन्मी जो धर्म तुम्हाला assign झालाय त्या धर्माला अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या करा. जरूर करा.

But please stop comparing and showing wrong deeds of other religions. 
Stop hating people of other religions. 

माणूस म्हणून जगा.जात धर्म सोडा .

माणुसकी हा धर्म आधी पाळा.

-- ऋतुजा




Monday, January 6, 2025

ह्या वळणावर..मागे वळून बघतांना

२०२५ सुरू झाले...वयाचे ४५ वर्ष सरले...आयुष्याच्या वाटेवर अर्ध्यापेक्षा नक्कीच पुढे आले आहे.

ह्या वळणावरून मागे वळून पाहताना ३ वाटा दिसतात..

पहिली वाट... खूप साऱ्या प्रेमळ आठवणी, प्रसंग, व्यक्ती आणि घटना दिसतात ह्या वाटेकडे. ह्या वाटेने खूप सारे आनंद दिले आयुष्यात. सुखाचे क्षण अनुभवले ते ह्याच वाटेवर.

दुसरी वाट...संकटांची, आव्हानांची आणि दुःखाची. ह्या वाटेने जरी आयुष्यात दुःख दिले, संकट आणले तरीही त्यामुळे मी strong झाले, कणखर बनले. मी घडत गेले ते ह्या वाटेवर आलेल्या आव्हानांमुळे.
प्रत्येक आव्हानाचा सामना करत स्वतःला सांभाळत, घडत गेले. ही वाट तेवढीच महत्त्वाची.

तिसरी वाट....न सुटलेल्या कोड्यांची. आयुष्यात काही कोडी असतात...तिचा भाग आपण असतो पण ती सुटत नाहीत...
like unsolved mysteries... असे काही unsolved mysteries राहून जातात त्या वाटेवर. असे वाटत राहते की ही कोडी सुटावी आयुष्यातली  किंवा काही गोष्टी ज्या आयुष्यात करायच्या राहून गेल्या...मागे पडल्या...परत मागे जाणे शक्य नसते त्या वाटेवर पण तरीही मागे वळून पाहिले की त्या गोष्टी दिसतात आणि खटकतात ..कारण कुठलीच अपूर्ण गोष्ट आयुष्यात नसावी असे मला वाटते  .

ह्या वळणावर नियती आपले life account settle करायला सुरुवात करत असेल का? 
काही घटना आयुष्यात अश्या घडत जातात किंवा काही व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येतात ज्यामुळे आयुष्यातली ह्या पूर्वी न सुटलेली कोडी सुटायला सुरुवात होते.  ...  पूर्वी असलेले गैरसमज दूर व्हायला मदत होते....

आयुष्याच्या उत्तरार्धात आपण प्रवेश करतोय ह्याची ही सूचना असेल का?

-- ऋतुजा





Friday, January 3, 2025

भास

मी मागे नसतानाही,
असल्याचा भास होतो ना तुला!
लोकांशी महत्वाचं बोलतानाही
माझा जोक आठवतो ना तुला!
आपण गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!
इतरांसोबत जोरात हसतानाही,
माझा दुरावा रडवतो ना तुला!
कधी उदास वाटतानाही,
माझा चेहरा हसवतो ना तुला!
तुला नको असतानाही,
माझा आवाज लाजवतो ना तुला!
तू शब्दांनी नाकारतानाही
चेहराच सांगतो ना
मी आवडतो तुला!

मी सोबत आहे असे तू कितीही वेळा सांगितले तरीही 
तू सोबत नसल्याचीच भावना जास्त असते!

लोकांशी महत्वाचं बोलतानाही
तुझ सोबत नसणं आठवत मला!

मी गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत तू नाहीस , मी एकटी आहे हे च जाणवते  मला!

इतरांसोबत जोरात हसतानाही,
तुझा दुरावा नेहमी च जाणवतो  मला!

कधी उदास वाटतानाही,
तुझा चेहरा आठवून अजून उदास व्हायला होतं मला !

मला तू हवा असतानाही,
माझ्या पासून तू दूर जातोस !

तू कितीही शब्दांनी सांगितले की मी आवडते तुला
तरीही ते मला जाणवत का नाही  !!


मनाला आनंद देते
प्रेमाची तुझी साद

कितीही कठोर वागलो तरी 
तू कायम आनंद देतेस

प्रेम  म्हटल की, 
रुसवा आलाच 

तरीही त्यातून पार पडत 
सांभाळतेस  तू मला




Wednesday, January 1, 2025

प्रेम

प्रेम काय असतं?

1. एखादी व्यक्ती आवडणे...
2. आवडलेल्या व्यक्तीचा ध्यास असणे
3. त्या व्यक्तीला बघण्याची इच्छा असणे
4. त्या व्यक्तीला बघण्याची संधी शोधत राहणे
5. त्या व्यक्तीसोबत बोलावे वाटणे
6. त्या व्यक्तीसोबत बोलण्याची संधी शोधत राहणे
7. त्या व्यक्तीला भेटावे वाटणे...
8. त्या व्यक्तीला आपल्या भावना समजाव्या, आपल्या मनातले प्रेम व्यक्त करावे वाटणे..

हो!! नक्कीच !!
ह्या सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात एक तर्फी प्रेमात.

जर ते प्रेम दोन्ही बाजूने असेल तर हे सगळे करावे वाटते च पण त्या बरोबर अजूनही काही गोष्टी असतात. जसे की..

१. समोरच्याचे प्रेम समजून घेणे..
२. त्या व्यक्तीचे प्रेम receive करणे. हो..receive करणे. कारण समोरचा ज्या प्रकारे आपल्यावर प्रेमाची बरसात करतो ते प्रेम accept करणे सुद्धा गरजेचे असते.
जर ते प्रेम तुम्ही receive च नाही करू शकले तर तुम्ही कमनशिबी आहात आणि अर्थात तो समोरचा ही.
३. समोरचा व्यक्ती खुश आहे की नाही आपल्यासोबत , आपण त्याच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही हे बघणे ही महत्त्वाचे.
४. प्रेम व्यक्त करणे आणि ते समोरच्या पर्यंत पोचवणे.

ह्या गोष्टी आपसूक होतात जेव्हा प्रेम दोन्ही बाजूने तितक्याच intensity ने असते. 
पण जर एखाद्याची intensity कमी असेल किंवा प्रेम करण्याची तेवढी capacity च नसेल तर...?

ह्यातल्या काही गोष्टी होत नसतील तर ते अर्धवट प्रेम असते का? 

देढ इश्किया !!

😄😄